भंडारा : शहरातील बसस्थानकासमोरील हिरणवार लॉजवर प्रेयसीसोबत रात्र घालविणाऱ्या प्रियकराचा अचानक मृत्यू झाला. सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि खळबळ उडाली. कृष्णा रायभान धनजोडे (२३) असे मृतकाचे नाव असून तो नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील केशोरी येथील रहिवासी आहे. लॉजमधून शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
मृत कृष्णाचे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झारपाडा येथील एका तरुणीवर प्रेम होते. दोघेही १९ ऑगस्ट रोजी एकमेकांना भेटण्यासाठी भंडारा येथे आले होते. दिवसभर शहरातील प्रेक्षणीय स्थळी दोघेही फिरले. सायंकाळी खरेदी केल्यानंतर दोघांनी लॉजवर एकत्र रात्र काढली. सकाळी लवकर उठून मुलीने कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. तो काहीच हालचाल करत नसल्याचे लक्षात येताच तरुणीने तातडीने लॉजच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली.
हेही वाचा – पावसाचे हे चालले तरी काय? आत्ताच आला आणि आत्ता पुन्हा विश्रांती
हेही वाचा – प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावरच मिळणार औषधे; देशभरात ५० ठिकाणी प्रयोग
कृष्णाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.