दुर्मीळ असलेली ब्राह्मणी घारीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या निसर्गरम्य वातावरणात मुक्तसंचार केला. या पक्षी निरीक्षणाचा अकोलेकरांनी आनंददायी अनुभव घेतला. ‘घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ हा अभंग आपल्याला परिचित आहे. संत, ऋषींनी निसर्ग संपदेतील प्रत्येक घटकांचा अभ्यास करून त्याची मानवी जीवनाशी सांगड घातली. निसर्ग आणि मानव यांच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. घार शिकारी पक्षी. यामध्ये चार प्रकारच्या घारी आढळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठी घार, नागरी घार, काळ्या पंखाची घार (कपाशी) आणि ब्राह्मणी घारीचा समावेश होतो. नागरी घार शहरामध्ये लक्षणीय संख्येने तर कपाशी घारीचा गावाच्या बाहेर नजरेत भरण्यासारखा वावर असतो. शहरातील कृषी विद्यापीठाचा विस्तीर्ण परिसर वृक्ष, वेली, वनस्पती, कीटक, फुलपाखरे, विविध जातीचे साप, रानडुकरे, निलगाय, हरिण, सायाळ तसेच बहुविध प्रकारच्या पक्ष्यांनी समृद्ध आहे. या परिसरात पक्षी निरीक्षणाचा वेगळाच आनंद असतो. ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी आणि हंसराज मराठे हे कृषी विद्यापीठ परिसरात निरीक्षण करीत असताना त्यांना एक ब्राम्हणी घारीचे अनोखे युगल नजरेस पडले.

हेही वाचा : पणन महासंचालनालयाच्या वार्षिक क्रमवारीत विदर्भातील बाजार समित्यांचा दबदबा

पावसाच्या लहरीपणावर ब्राह्मणी घारीचा प्रणय अवलंबून असतो. घारीचे डोके, छाती व पोट पांढरे, तर पाठीचा रंग शेपटीपर्यंत विटकरी असतो. शिकार साधण्यात तरबेज असला तरी स्वभावाने मात्र हा पक्षी भित्रा असतो. इतर घारी, कावळे यांना आपली शिकार बहाल करतो. हा निसर्गदूत कृषी विद्यापीठ परिसरात आढळल्याने पक्षीमित्रांकडून आनंद व्यक्त होत आहे.

हेही वाचा : वाशीम : मुलींनीच केले आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

निसर्गाने नटवलेला ब्राह्मणी घार एक अत्यंत देखणा जीव आहे. सध्या पाऊस पडत असल्याने ब्राह्मणी घारीचा मुक्तसंचार दिसून आला. पाणवठ्यालगत मुक्काम करून शिकार करणे या घारींचा आवडीचा कार्यक्रम. सरडे, खेकडे, छोटे पक्षी, मासे हे यांचे आवडते खाद्य असते, असे ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी म्हणाले.