चंद्रपूर : राज्यात राजकीय घडामोडी अतिशय झपाट्याने बदलत असताना काँग्रेसने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी मंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे वडेट्टीवार यांची दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या पंधरवाड्यापासून राज्यातील राजकारण वेगाने बदलण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट भाजपा सोबत सत्तेत सहभागी झाला आहे. राज्यात शिंदे शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षाचे सरकार सत्तेत आहे. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा होईल असे वाटत होते. मात्र आज वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे संख्याबळ बघता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस पक्षाकडे आले आहे. काँग्रेस पक्षात या पदावरून घमासान सुरू होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नागपूरचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्यासोबत या पदासाठी अन्य नेत्याचे नाव समोर होते. तर काँग्रेसमधील पटोले विरोधी गटाने माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांचे नाव समोर केले होते.

हेही वाचा – संघटनात्मक वाढीसाठी राष्ट्रवादीचे सदस्य जोडो अभियान; ‘ईडी’ची भीती आणि सत्तेच्या लालसेने…

काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीतदेखील विरोधी पक्षनेता कोण ? यावर बरेच मंथन झाले. विधान सभेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा नेता हवा यावर सर्वांचे एकमत झाले. शेवटी काँग्रेस श्रेष्ठीनी विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, वडेट्टीवार १६ जुलै रोजी चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघात दोऱ्यावर होते. याच दोऱ्यात वडेट्टीवार काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावर यांच्या निवासस्थानी चहा नाष्टा करीत असताना अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या दिल्ली कार्यालयातून काँग्रेस श्रेष्ठींचा फोन आला. विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्याची माहिती वडेट्टीवार यांना दिली होती.

हेही वाचा – दहशतवादी अब्दुल कादीर पठाण तबलीग जमातचा कार्यकर्ता

वडेट्टीवार यांनी शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केली. गडचिरोली जिल्हा शिवसेना प्रमुख, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सदस्य, चिमूरमधून शिवसेना आमदार म्हणून विजयी, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतून फुटून बाहेर पडले. त्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश, पोटनिवडणुकीत चिमूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय, २०१४ मध्ये ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून विजय, २०१८ मध्ये सहा महिन्यांसाठी विधानसभेत विरोधी पक्ष नेता, २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच आपत्ती, पुनर्वसन, ओबीसी खात्याचे मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे.