नागपूर : ब्रिटिशकालीन महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचा बृहत आराखडा अखेर तब्बल १२ वर्षानंतर मंजूर करण्यात आला. नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने याला मान्यता दिली.शहराच्या मध्यवर्ती भागातील महाराजबाग प्राणिसंग्रहालय असून त्याचे व्यवस्थापन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत करण्यात येते. ब्रिटिशकाळात सुरू झालेल्या या प्राणिसंग्रहालयात अजूनही दूरदुरून पर्यटक येतात. या प्राणिसंग्रहालयाचा बृहत विकास आराखडा २०११ साली केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला सादर करण्यात आला होता. एक-दोन नाही तर तब्बल चार वेळा प्राधिकरणाने महाराजबाग प्रशासनाला यात सुधारणा करण्यास सांगितले. चार वेळा तो सुधारणांसाठी परत पाठवण्यात आला. प्रत्येकवेळी महाराजबाग प्रशासनाने यात सुधारणा केल्या.

१४ डिसेंबर २०२२ ला तो पुन्हा एकदा प्राधिकरणाला सुधारणा करून पाठवण्यात आला. यात व्यवस्थापन, देखरेख, वन्यप्राणी, प्रेक्षक, प्रशासकीय व्यवस्था आदी सुधारणांचा समावेश होता. त्या करून पाठवण्यात आल्यानंतर याला मान्यता देण्यात आली. २०११ पासून प्राधिकरणाने सुचवलेल्या दुरुस्त्यांमध्ये महाराजबाग सोसायटीमार्फत संचालित करावे, प्राणिसंग्रहालयात सुरू असलेले प्रात:भ्रमण थांबवावे, आवश्यक पदे किमान कंत्राटी पद्धतीने भरावी, प्रशासकीय पदानुक्रम सुधारित करावा आदींचा समावेश होता. या सुधारणांबाबत विद्यापीठाने ठोस निर्णय घेतल्यामुळे प्राधिकरणाने महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या बृहत विकास आराखड्याला मंजुरी दिली.महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या विकासाच्या दृष्टीने बृहत विकास आराखड्यास मंजुरी महत्त्वाची आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार व केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांनुसार प्राणिसंग्रहालयाचा विकासाकरिता आता शासनाकडे मदत मागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?

आराखडा मंजूर झाल्यामुळे आता प्राणिसंग्रहालयाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आराखडा मंजूर नसल्याने बरीच विकास कामे मागे पडली होती. पण, आता मंजुरीनंतर महाराजबाग उद्यान तसेच प्राणिसंग्रहालयाचा विकास करता येईल. तसेच विकास कामासाठी आणि कर्मचारी भरतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करता येईल.- डॉ. प्रकाश कडू, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय

महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या विकासाकरिता व भविष्याच्या दृष्टीने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेली बृहत विकास आराखड्याला दिलेली मंजुरी महत्त्वाची आहे. भविष्यात महाराजबाग परिसराचा विकास प्राणिसंग्रहालयाच्या नियमांच्या अधीन राहून केल्यामुळे नागपूरच्या नागरिकांना शहराच्या मध्यभागी जैवविविधतेने परिपूर्ण नैसर्गिक केंद्रामुळे आरोग्यदायक व प्रदूषणमुक्त वातावरण मिळण्यास मदत होईल.- डॉ. सुनील बावस्कर, प्रभारी, महाराजबाग प्राणिसंग्रहालय