नागपूर: दरवाढीला विरोध केल्याने स्थानिक केबल वाहिन्यांच्या माध्यमातून होणारे प्रमुख खासगी मनोरंजन वाहिन्यांनी त्यांचे प्रक्षेपण बंद केल्याने मागील तीन दिवसांपासून प्रेक्षकांची गैरसोय होत आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 ट्राय आणि खासगी वाहिन्यांच्या व्यवस्थापनाने त्यांच्या वाहिन्यांच्या प्रक्षेपण दरात वाढ केली आहे. त्याला अखिल भारतीय डिजिटल केबल फेडरेशनने विरोध केला असून दरवाढीच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.  फेडरेशनचे सरचिटणीस मनोज छंगानी म्हणाले “वाहिन्यांनी केबल ऑपरेटर्सला ४८ तास आधी दरवाढीबाबत सूचना दिली. आम्ही त्यांना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने दरवाढीला स्थगिती द्यावी व प्रसारण बंद न करण्याचे विनंती केली होती. पण खासगी वाहिन्यांनी ती अमान्य केली.

हेही वाचा >>> भंडारा : ‘त्याच्या’ अगदी १५ फुटाच्या अंतरावर मोठे अस्वल होते, अचानक…

केबल टीवी प्लेटफार्मवरून चॅनल बंद केले. परिणामी देशभरातील सुमारे ४ .५० कोटी केबल टीवी पाहणाऱ्यांना वाहिन्यांपासून वंचित राहावे लागले आहे. नव्या दरानुसार ग्राहकांच्या मासिक शुल्कात ६० टक्के वाढ अपेक्षित आहे. या निर्णयामुळे केबल ऑपरेटर्स आणि ग्राहकांचे कंबरडे मोडणारा असून फेडरेशन ग्राहकांना सध्याच्या दरातच खासगी वाहिन्यांचे प्रसारण सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे फेडरेशनकडून कळवण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Broadcasting of private entertainment channels stopped in nagpur controversy cwb 76 ysh