अमरावती : दिराने आपल्या वहिनीसोबतच बळजबरीचा प्रयत्न केला. वहिनीने प्रतिकार केल्यावर दिराने त्यांना चावा घेतला. ही संतापजनक घटना चांदूरबाजार ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
हेही वाचा – वर्धा : बाजार समिती निवडणुकीत बहीण – भाऊ परस्पर विरोधात
पीडित ३० वर्षीय महिला ही सकाळी आंघोळीला गेली होती. यावेळी त्यांचा दीर तेथे आला. त्याने त्यांच्यासोबत असभ्य वर्तन करून बळजबरीचा प्रयत्न केला. महिलेने त्याचा प्रतिकार केल्यावर दिराने त्यांना चावा घेतला. त्यामुळे पीडित महिलेने आरडाओरड केली. आवाज ऐकून त्यांची सासू व जाऊ तेथे आल्या. त्यांना बघून दीर घरातून निघून गेला. त्यानंतर जाऊने उलट पीडित महिलेलाच तू बदमाश आहे, माझ्या नवऱ्याला फसवत आहे, असे म्हणत त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. या प्रकरणी पीडित महिलेने चांदूरबाजार ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.