नागपूर: बहिणीच्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही थरारक घटना मंगळवारी मध्यरात्री अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. निखिल शाहू उके (२८, अजनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी या हत्याकांडात तीनही आरोपींना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी हिमांशू याच्या बहिणीसोबत निखिल उके याचे प्रेमसंबंध होते. त्याची कुणकुण हिमांशूच्या कुटुंबापर्यंत पोहचली. बहिणीला मारहाण करून तिला प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. त्यानंतर निखिल याची समजूत घालून बहिणीपासून दूर राहण्यास सांगितले. यानंतर प्रेमसंबंध ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काही महिने निखिलने संबंध तोडले होते.

Sanjay Rathod case, girl suicide, High Court,
संजय राठोड प्रकरण : तपासाला आक्षेप नसल्याचा आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा उच्च न्यायालयात दावा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Three friends drowned Buldhana
बुलढाणा : पोहोताना तिघे मित्र बुडाले! दोघे बचावले, एकाचा मृत्यू
young man killed due to argument happen during joking an incident in Uttamnagar area
चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून तरुणाचा खून, उत्तमनगर भागातील घटना
Lalbaug Accident, Datta Shinde Arrested
Lalbaug accident : लालबाग अपघात आणि नुपूर मणियारच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेला मद्यधुंद आरोपी दत्ता शिंदे अटकेत
kalyaninagar car accident accussed surendra agarwal for abusing and threatening to kill employee
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
Kolkata Rape-Murder News
Kolkata Rape-Murder : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपीच्या वकील म्हणून नियुक्त झालेल्या महिला वकील कोण?
Youth dies in dog attack Mumbai news
मुंबई: श्वानाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

हेही वाचा… ग्रंथपालांच्या जीवनात उगवली पहाट! वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा

मात्र, गेल्या महिन्यात पुन्हा भेटून लग्नाची तयारी करीत होता. त्यामुळे हिमांशूने मित्र अंकित ऊर्फ अन्नी नीलेश वाघमारे (२४, सावित्रीबाई फुलेनगर) आणि विशाल ऊर्फ बब्बू काल्या लक्ष्मण फुलमाळी (२२, कौशल्यानगर) यांना मदत मागितली. मंगळवारी निखिलला घरी बोलावले. तो घराजवळ पोहचताच दबा धरून बसलेल्या तिघांनीही चाकूने हल्ला केला. त्याचा तासाभरातच मृत्यू झाला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.