अमरावती : लग्‍न असो किंवा पार्टी, गाण्‍यांवर नाचण्‍याचे आकर्षण असतेच. तरूणाईला थिरकायला आवडते. पण, हा हट्ट कोणत्‍या वळणावर जाऊ शकतो, याचा प्रत्‍यक्ष अनुभव जिल्‍ह्यातील नांदुरा लष्‍करपूर येथील एका कुटुंबाला आला. लग्‍नाच्‍या पार्टीत नाचू दिले नाही, यामुळे संतापलेल्‍या तरूणाने नवरदेवाच्‍या भावावरच तलवारीने हल्‍ला केल्‍याची घटना रविवारी रात्री ११.४५ वाजताच्‍या सुमारास घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तेजस सुनील तायडे (२३, रा. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी माहुली जहागीर पोलिसांनी नवरदेवाच्‍या बहिणीच्‍या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध हत्‍येचा प्रयत्‍न, शस्‍त्र अधिनियम व अॅट्रॉसिटी कायद्यान्‍वये गुन्‍हा दाखल केला आणि त्‍याला तत्‍काळ अटक करण्‍यात आली. नांदुरा लष्‍करपूर येथे एका तरूणाच्‍या लग्‍नाची पार्टी आयोजित करण्‍यात आली होती. अनेक लोक वर-वधूला आशीर्वाद देण्‍यासाठी एकत्र आले होते.

हेही वाचा >>> अकोला : ट्रक उलटला अन् मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून युवकाचा जीव गेला

पार्टी अखेरच्‍या टप्‍प्‍यात आली असताना आरोपी तेजस तायडे याने नाचण्‍याचा हट्ट धरला. नवरदेवाकडील मंडळीने आता रात्र झाली. अजून नाचगाणे नको, म्‍हणून त्‍याला नकार दिला. आरोपी तेजस हा रागाने तेथून निघून गेला आणि नंतर हाती तलवार घेऊन पार्टीमध्‍ये परतला. मला नाचू का दिले नाही, असे म्‍हणत त्‍याने नवरदेवाच्‍या भावावर तलवारीने वार केले, त्‍यामुळे एकच गोंधळ उडाला. काही लोकांनी त्‍याला अडवल्‍याने पुढील अनर्थ टळला.