अमरावती : शहरातील वडाळी येथील बांबू गार्डनमध्ये पक्षी निरीक्षकांना ‘तपकिरी छातीच्या माशीमार’ पक्ष्याची महत्त्वपूर्ण नोंद घेण्यात यश आले आहे. प्रशांत निकम पाटील, संकेत राजूरकर आणि ओम भोकरे या पक्षी निरीक्षकांनी त्‍याची नोंद घेतली आहे.

नुकतेच छायाचित्रित करण्यात आलेल्या या पक्ष्याचे इंग्रजी नाव ‘ब्राऊन ब्रेस्टेड फ्लायकॅचर’, असे असून शास्त्रीय नाव ‘म्युसीकापा मुट्टए’ आहे. ‘म्युसिकापीडी’ कुळातील हा लहानगा माशीमार भारताचा उत्तर पूर्व भाग, चीन आणि थायलंडच्या प्रदेशात प्रजनन करतो. दक्षिण भारत आणि श्रीलंकेत प्रामुख्याने अन्नाच्या शोधात हिवाळी स्थलांतर करून येतो. याची लांबी १२ ते १३ से.मी. असते. पंखांच्या वरचा भाग हिरवट तपकिरी असून, पंखांच्या कडा अधिक गडद असतात. वरच्या पंखांना तपकिरी लालसर छटा दिसून येतात. डोळे तुलनेने अधिक टपोरे असून डोळ्यांभोवती पांढऱ्या रंगाचे वलय, आहेत. वरची चोच गडद निळसर आणि खालची चोच फिकट या बाबी या पक्ष्‍याच्या खास ओळखखुणा म्हणता येतील. अस्पष्ट आवाज असणारा हा पक्षी शक्यतो झाडाच्या वरच्या भागात विचरण करत असला तरी अन्न म्हणून छोटे कीटक आणि अळ्या यांच्या शोधार्थ कमी उंचीची झाडी व झाडांच्या खालच्या भागातही हा पक्षी दिसून येतो.

tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
Image Of Tiger.
Tiger Travel : टी-२२ च्या बछड्याचा ५०० किलोमीटर प्रवास… यवतमाळचा वाघ धाराशिव, सोलापूरात कसा आला?
Shocking video Shark attacks crocodile carcass australia terrifying scene video goes viral on social
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
loksatta readers feedback
लोकमानस: चाचणीला परवानगी मिळालीच कशी?
Navi Mumbai Foreign Birds , Uran , Panvel Bay Shore,
नवी मुंबई : पाणथळींना विदेशी पाहुण्यांचा साज, उद्योगपती, बिल्डरांचा डोळा असलेल्या पाणथळींवर पक्ष्यांचा बहर
Turtle eats live crab video viral
VIDEO: “कुणालाच हलक्यात घेऊ नका” एका सेकंदात कासवाने गिळला जिवंत खेकडा, शिकारीची ‘ही’ भयानक पद्धत एकदा पाहाच

हेही वाचा – ‘सर्वोदय’च्या स्वागताध्यक्षपदी सुनील केदारांची नियुक्ती ही तर गांधी विचांराची हत्याच – महादेव विद्रोही

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची मागणी फेटाळली, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंची शिवसेना…”

बांबू गार्डन, वडाळी तलाव हे ठिकाण विविध माशीमार आणि वटवट्या पक्ष्यांच्या नोंदीचे महत्वाचे स्थान म्हणून पुढे येत आहे. या परिसरात असलेल्या बांबू आणि इतर खुरटी झाडी, तसेच मोठ्या वृक्षाची मुबलकता आणि वर्षभर असणारी पाण्याची मुबलकता यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांच्या अनेक उल्लेखनीय नोंदीची भर पडत आहे. तपकिरी छातीच्या माशीमार पक्ष्याची ही अमरावती जिल्ह्यातील पहिलीच नोंद ठरली असल्यामुळे पक्षी निरीक्षक, अभ्यासक आणि वन्यजीव छायाचित्रकार यांनी नोंदकर्त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. सहाय्यक वनसंरक्षक ज्योती पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे आणि कर्मचारी वर्गाच्या वेळीवेळी सहकार्याच्या भूमिकेबद्दल नोंदकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Story img Loader