चंद्रपूर : वरोरा शहरातील फुकट नगर परिसरात एका युवकाची लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे वरोरा शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – नागपूर : सत्ता बदलानंतर प्रथमच आजी-माजी गृहमंत्री आमोरासमोर, काय घडले?
रितेश लोहकरे, असे मृताचे नाव आहे. रितेशचा मृतदेह हा त्याच्या घरापासून अगदी ५०० मीटर अंतरावर आढळल्याने मारहाण होताना कोणाला ऐकू कसे आले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अज्ञातांनी लाकडी दंड्याने डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.