बुलढाणा : उमेदवारांची भाऊ गर्दी झालेल्या चिखली विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे (बसपा)चे उमेदवार अडव्होकेट शंकर शेषराव चव्हाण यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी चिखली येथीलच एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्रकरणी चौघा युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे राजकीय अथवा निवडणूक विषयक कारण नसल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.मात्र असे असले तरी राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या चिखली शहर आणि मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी बसपाचे उमेदवार शंकर शेषराव चव्हाण ( वय ४० वर्ष राहणार मेहकर फाटा चिखली, जिल्हा बुलढाणा) यांनी स्वतः फिर्याद दिली आहे. फिर्यादी चव्हाण यांच्या तक्रारी वरून चिखली पोलिसांनी हर्षल ओमप्रकाश इंगळे, आकाश इंगळे ,मनोज इंगळे आणि मयूर मुरडकर (सर्व राहणार भानखेड) यांच्या विरुद्ध आज शनिवारी, २ नोव्हेंबर रोजी कारवाई केली आहे. चौघा आरोपी युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३), ३२४ (४), ३(५) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Praful Patel criticized Raj Thackeray for his statement
अजून मूल जन्माला आलं नाही, त्याआधीच त्याचं साक्षगंध, लग्न…, खा. प्रफुल्ल पटेल यांचा ‘यांना’ टोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

हेही वाचा…विमानात बॉम्बची धमकी देणारा …, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल काय म्हणाले जाणून घ्या

u

फिर्यादीनुसार चव्हाण कुटुंबियाचे चिखली -देऊळगाव राजा राज्य मार्गावर हॉटेल शंकर फौजी नावाचा ढाबा आहे. २ नोव्हेंबर च्या रात्री दीड वाजताच्या सुमारास हे युवक आरडाओरड आणि धामधूम करीत होते. यावेळी फिर्यादी (शंकर चव्हाण यांचे) वडील शेषराव चव्हाण यांनी त्यांना हटकले.तसेच अपरात्री हॉटेल समोर धिंगाणा करू नका असे म्हटले . यावेळी चार आरोपीनी शंकर चव्हाण यांना काठी, लोखंडी रॉड ने तर त्यांचे वडील शेषराव चव्हाण आणि हॉटेलचे कर्मचारी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर हॉटेलमधील साहित्य आणि पदार्थांचे नुकसान करुन धमक्या दिल्या चे तक्रारीत नमूद आहे. या खळबळजनक घटनेचा तपास चिखली।पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शरद भागवतकर करीत आहे.

Story img Loader