नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील प्रत्येक वाघ स्वतःची काही ना काही ओळख पर्यटकांना देऊन जातो. ‘बबली’ या वाघिणीच्या अदा पर्यटकांनी पाहिल्याच आहेत, पण आता तिचे बछडे त्याहून अधिक जास्त पर्यटकांना लळा लावत आहेत. त्यांच्या मस्तीचा असाच एक व्हिडीओ तयार केलाय वन्यजीवप्रेमी जतीन पटेल यांनी.
हेही वाचा – लोकजागर : ‘नाचून’ काय होणार?
ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्रातील वाघांनी पर्यटकांना जास्त आकर्षित केले आहे. सध्या गाभा क्षेत्रातील पर्यटन बंद असले तरी बफरमधील वाघांनी पर्यटकांना अजिबात निराश केलेले नाही. उलट गाभा क्षेत्रापेक्षा बफरमधील वाघांनी पर्यटकांना वेड लावले आहे. अलिझंझा बफरक्षेत्राची राणी ‘बबली’ जेवढी मस्तीखोर, त्यापेक्षाही तिचे बछडे अधिक मस्तीखोर आहेत आणि त्यांनी पर्यटकांना अक्षरशः वेड लावले आहे.पावसाळी वातावरणाचा ते पुरेपुर आनंद घेत असून जिकडेतिकडे मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कधी एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, एकमेकांच्या अंगावर बसणे असे नानातऱ्हेचे उद्योग सुरू असतात. असाच एक मस्तीचा प्रसंग जतीन पटेल यांनी कॅमेऱ्यात कैद केलाय.