चंद्रपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन, पवित्र ऐतिहासिक दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी रविवारी, हजारो बौद्धबांधव महामानवाला वंदन करण्यासाठी दाखल झाले होते. दीक्षाभूमीवर अक्षरक्ष: निळाई अवतरली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन व धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी चंद्रपूरच्या ऐतिहासिक व पवित्र दीक्षाभूमीवर १६ ऑक्टोबरला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या तेजस्वी दिनाच्या स्मरणार्थ रविवार, १५ व सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायी जमू लागले होते. दुपारी ४.३० वा. विश्वशांती, बंधुत्व प्रेरित वाहनासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. गांधी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून मिरवणूक मुख्य मार्गांने थेट दीक्षाभूीवर पोहोचली. त्यानंतर धम्म ध्वजारोहण, धम्मज्योत प्रज्वलन करून उपस्थित शेकडो बौद्ध बांधवांनी सामूहिक बुद्धवंदना व स्फूर्तिगान सादर केले. त्यानंतर उद्घाटनाच्या मुख्य साेहळ्याला सुरुवात झाली.

हेही वाचा – वर्धा : धक्कादायक! पतीने पत्नीला दगडाने ठेचले

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, भदन्त धम्ममेत्ताघोष, विशेष अतिथी श्रद्धेय भदन्त ज्ञानज्योती महास्थवीर, संघारामगिरी, चिमूर श्रद्धेय भदन्त सारीपुत्त, म्यानमार (ब्रह्मदेश) प्रमुख अतिथी मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, महापालिका आयुक्त विपीन पालीवाल उपस्थित होते. सायंकाळी ८.०० वाजता जाधव सिस्टर्स आणि संच यांचा जागर समतेचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्धबांधव उपस्थित होते.

हेही वाचा – चंद्रपूर : माता महाकाली महोत्सवाचे १९ ते २३ ऑक्टोबरपर्यंत आयोजन; लखबीरसिंग लख्खासह ‘या’ गायकांचा भक्तिसंगिताचा कार्यक्रम

‘मल्टीमीडिया छायाचित्र’ प्रदर्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट असे ‘मल्टीमीडिया छायाचित्र’ प्रदर्शन असून नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन महामानवाचा जीवन प्रवास जाणून घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी रविवारी केले. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांच्या सहयोगाने येथील दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे तीन दिवसीय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा जीवनप्रवास’ या विषयावर आधारित मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buddhist brothers and sisters attend the dhammachakra anupravartan din ceremony at diksha bhoomi in chandrapur rsj 74 ssb
Show comments