बुलढाणा : ‘बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क’तर्फे आज बुलढाण्यात काढण्यात आलेला महामोर्चा म्हणजे आंबेडकरी समाजाचे (चळवळीचे) जंगी शक्तिप्रदर्शन ठरले. या मोर्च्यात महिलांसह भिक्कुसंघही मोठ्या संख्येने व जिद्दीने सहभागी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज, रविवारी दुपारी बुलढाणा चिखली राज्यमार्गावरील जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र (जुने डीएड महाविद्यालय) येथून या मोर्च्याला सुरुवात करण्यात आली. ऐतिहासिक भोन गावपरिसरातील मौर्यकालीन बुद्ध स्तूप आणि अवशेष नष्ट करण्याचे कारस्थान करणाऱ्या राज्य सरकार व प्रशासनाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा…यवतमाळ : लोकसभा निवडणुक तारखा जाहीर, पण उमेदवार ठरेना! इच्छुक संभ्रमात, ऐनवेळी उमेदवारांची आयात…

संघटनेचे राष्ट्रीय संरक्षक वामन मेश्राम आणि राष्ट्रीय प्रभारी विलास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या मोर्च्यात आंबेडकरी समाज, संघटनेचे पदाधिकारी, सभासद, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोठी देवी, वन कार्यालय, तहसिल चौक, स्टेट बँक चौक मार्गे निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलयावर येऊन धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यानंतर जिजामाता प्रेक्षागार नजीक सभा पार पडली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buddhist international network organizes grand march in buldhana against destruction of mauryan era buddha stupa scm 61 psg