छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचे सांगणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना जिल्ह्यातील केळवद (ता. चिखली) येथील गावकऱ्यांनी केली. या अभिनव निषेधरूपी प्रार्थनेची खमंग चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व प्रवक्ते त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानाचा धुरडा खाली बसायला तयार नसताना आ. लाड यांनी जावईशोध लावला. यामुळे सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या केळवद गावातील शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे ‘प्रार्थना आंदोलन’ केले. आमदार लाडसारख्या ‘ज्ञानी’ नेत्यांना शिवरायांनीच सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना करण्यात आली.