बुलढाणा: राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात हमखास मंत्रिपद मिळणार अशी खात्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बाबतीत अगदी दूरवरच्या बुलढाणा जिल्हावासीयांना देखील होती. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या लाल दिव्याची देखील चाहत्यांना खात्री होती. मात्र भारतीय जनता पक्षाप्रमाणेच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित दादा गट) देखील राजकीय धक्कातंत्रचा वापर केला. या दोघांना मंत्रिपदाची संधी नाकारण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील समर्थकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. समता परिषदेच्या माध्यमाने राज्यभरात लोकप्रिय ठरलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्याने जिल्ह्यातही संताप व्यक्त होत आहे.

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्याप्रकरणी ओबीसी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा येथे आज सोमवारी, १६ डिसेंबर रोजी रास्तारोको केला. ओबीसी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही त्यांना डावलण्यात आले ओबीसींसाठी रस्त्यावर लढणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळातून बाजूला केल्याबद्दल संतप्त झालेल्या ओबीसी तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा येथे रास्ता रोको आंदोलन करून आपला विरोध प्रकट केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात विरोध दर्शवित जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान सिंदखेडराजा पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली.

Buldhana Akash Pundkar, Minister Akash Pundkar,
बुलढाणा : सहा दशकांत मोजक्या नेत्यांनाच ‘लाल दिवा! आकाश फुंडकर दिग्गजांच्या यादीत
minister post Chandrapur, Devendra Fadnavis Cabinet,
राज्याला मुख्यमंत्री देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान नाही
Opposition protest against EVM, EVM,
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आमदारांचे ‘ईव्हीएम हटवा’ आंदोलन
Mango , Amaravati Mango, Vidarbha Mango,
यंदा आमरस जोरात, दरही कमी होणार; कडाक्याच्या थंडीमुळे आंबेमोहोर…
Arvi Farmer Orange Aid, Sumit Wankhede,
हे शेतकरी ठरले भाग्यवंत! नियमात बसत नाही मात्र ‘देव’ पावला आणि…
Vidarbha arrears, Vidarbha , Devendra Fadnavis,
विदर्भाच्या अनुशेष मोजणीसाठी सत्यशोधन समिती स्थापन करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
cm Devendra fadnavis
बीड, परभणीच्या घटनेवर फडणवीस थेटच बोलले, “तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई…”
Devendra Fadnavis EVM, Devendra Fadnavis,
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “होय आमचे सरकार ईव्हीएमचे, कारण…”
Tea Party Ramgiri Nagpur, Nagpur Devendra Fadnavis,
कमी संख्याबळाचा वारंवार उल्लेख, विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न

हेही वाचा – बुलढाणा : सहा दशकांत मोजक्या नेत्यांनाच ‘लाल दिवा! आकाश फुंडकर दिग्गजांच्या यादीत

हेही वाचा – राज्याला मुख्यमंत्री देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान नाही

आमदारांचे दबावतंत्र अन देवेंद्र फडणवीसांचा निषेध

दरम्यान जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांना मंत्रिपद नाकारल्याने मतदारसंघात संतापाची लाट उसळली आहे. समाजमाध्यमावर त्यांचे चाहते आणि समर्थक नेटकरी आपला संताप व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहे. हे समर्थक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करीत आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सन २००४ पासून संजय कुटे हे जळगाव विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले आहे. या ओबीसी नेत्याने मतदारसंघावर भाजपचा झेंडा पंचवीस वर्षांपासून फडकवत ठेवला आहे. मात्र असे असतानाही जिल्ह्यातील आमदारांच्या दबावतंत्राला बळी पडून त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले. याबद्धल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध असो, असे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत.

Story img Loader