बुलढाणा : अल्पवयीन बालिकेला पोटदुखीच्या उपचारासाठी आईने रुग्णालयात नेले असता अतिशय धक्कादायक व घृणास्पद प्रकार उघडकीस आला. सदर बालिका चार महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले. यावर कळस म्हणजे तिच्या बापानेच हे पाप केल्याचे तपासात उघड झाले. यामुळे आईसह, डॉक्टर, पोलिसही चक्रावले.

बापलेकीच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या या नराधम पित्याला बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा न्यायालयाने आजीवन (मरेपर्यंत) कारावासाची कठोर शिक्षा ठोठावली आहे.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना

हेही वाचा – माजी मंत्री सुनील केदार विधानसभा लढवू शकणार नाही, उच्च न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार

स्थानिय प्रमुख जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी ३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी हा निकाल दिला आहे. वासनांध विकृतांना जरब बसविणारा हा निकाल आहे. शेख शकील असे नराधम आरोपी पित्याचे नाव आहे. ही संतापजनक घटना २०२३ मध्ये घडली होती. खटल्याच्या पार्श्वभूमीनुसार मार्च २०२३ मध्ये चिखली तालुक्यातील पीडित १६ वर्षीय मुलगी पोट दुखत असल्याने आपल्या आईसह चिखली येथील दवाखान्यात गेली होती. डॉक्टरांनी मुलीला तपासले असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याविषयी डॉक्टरांनी आई आणि पीडितेला विचारले असता त्यांनी काही सांगण्यास नकार दिला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी ‘एमएलसी’द्वारे चिखली पोलिसांना ही माहिती दिली.

यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण तळी यांनी रुग्णालयात जाऊन पीडिता व तिच्या आईकडे चौकशी केली असता, दोघींनी ‘हे प्रकरण आमच्या घरचे आहे आम्ही घरातच निपटारा करू’ असे त्यांना सांगितले. दरम्यान, पीडित मुलीला रक्तस्त्राव होत असल्याने तिच्या जिवाला धोका होता. त्यामुळे डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी तिला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक तळी यांनी चिखली पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी पीडितेला विश्वासात घेतल्यानंतर, तिच्या आईसमक्ष तिचे बयान नोंदविण्यात आले. पीडिताने आपल्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचे सांगितले. यावर कळस म्हणजे, तिच्या स्वतःच्या बापानेच हे दुष्कृत्य केल्याचे ती म्हणाली. पीडितेच्या आईचे जेव्हा बयान नोंदविण्यात आले, तेव्हा त्यांनी देखील तिच्या वडिलांनीच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असल्याचे सांगितले. हे ऐकून पोलीस हादरून गेले. हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. पीडितेचा नराधम बाप शकीलला अटक करण्यात आली. बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी म्हणून तो निष्पन्न झाला.

डीएनए चाचणीत सिद्ध

पुढील तपासासाठी पीडित अल्पवयीन मुलीचे व तिच्या नराधम बापाचे डीएनए नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. घटनेचे गांभीर्य आणि गुंतागुंत लक्षात घेता सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी स्वतःकडे घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे यांनी पीडित मुलीसह तिच्या आईचे बयान ‘व्हिडिओग्राफी’तून घेतले.

आरोपी शकील विरोधात पुरावा मिळून आल्याने बुलढाणा येथील विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांची नियुक्ती करण्यात आली. खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार सादर करण्यात आले. पीडिता, तिचा गर्भ व आरोपीचे डीएनए नमूने असा रासायनिक विश्लेषण अहवालसुद्धा प्राप्त झाला. त्यामध्ये आरोपी पित्याच्या ‘पापा’ वर शिक्कामोर्तब झाले. डिसेंबर २०२२ मध्ये पीडितेची आई माहेरी गेलेली असताना तिच्या वडिलांनी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले असे सिद्ध झाले. आरोपीने वैद्यकीय तपासणी दरम्यान, डॉक्टरांना सांगितलेल्या घटनेचा तसेच इतर पुराव्यांना ग्राह्य धरत विशेष न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध होत असल्याचे नमूद केले. बचाव पक्षातर्फे करण्यात आलेल्या युक्तीवादात मुलीच्या जन्माचा दाखला न्यायालयासमोर सादर केलेला नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.

हेही वाचा – चोरीचे वाहन नोंदणी प्रकरण : कारवाई झालेल्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांची संख्या सहावर

यामुळे विशेष न्यायाधीश मेहरे यांनी पुराव्या कायद्याचे कलम १६५ नुसार संबंधित ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकाऱ्याला पीडित मुलीचा जन्म दाखला सादर करण्याचे आदेश दिले. साक्षीदार म्हणून हा पुरावा देखील नोंदविण्यात आला. प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांनी प्रभावी युक्तिवाद केला. आरोपी शेख शकील यास पोक्सो कायद्यानुसार मरेपर्यंत सश्रम जन्मठेपेची शिक्षा व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षासुद्धा ठोठावली गेली आहे. पैरवी म्हणून चिखली पोलीस ठाण्याचे हवालदार नंदाराम इंगळे, झगरे व मिसाळ यांनी सहकार्य केले.