नागपुर : समृध्दी महामार्गवर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हलच्या अपघातामध्ये नागपूरचे सात प्रवासी असेल तरी ते नागपूरला कुठल्या भागात राहतात याचा शोध लागत नाही. आठ तास होऊनही बुकिंग ऑफिस बंद आहे. अपघात होऊन सहा सात तास झाल्यानंतर येथील गणेशपेठेतील बुकिंग ऑफिस बंद आहे. त्यामुळे अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे कळण्यात अडचणी येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… Buldhana Accident : अपघातात वर्ध्याचे चौदा; चार प्रवाशांची ओळख पटली, प्रशासनाचं पथक घटनास्थळी रवाना

हेही वाचा… बस अपघात: नागपूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी येथे संपर्क साधावा

अपघातातील प्रवासी कुठे राहतात याची माहिती प्रशासनाकडे नाही. बुकिंग ऑफिस मधील कर्मचारी सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले माझ्याकडे केवळ नावे आणि मोबाईल नंबर आहेत .मी बुकिंग ऑफिस उघडू शकत नाही . तशा सूचना मला दिली आहे. तुम्ही मुख्य कार्यालय यवतमाळ येथे आहे .तेथे संपर्क साधा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana accident booking office is not opened yet in nagpur name of passenger belongs to nagpur still unknown vmb 67 asj