बुलढाणा : खामगाव येथील न्यायालयाने शेतकऱ्याला न्याय देणारा आणि खत उत्पादक कंपन्यांना जरब बसविणारा निकाल दिला आहे. मिश्र खतामध्ये भेसळ आढल्याने कृषीदेव खत कारखान्याचे मॅनेजर पी व्ही देशमुख व कृषी केंद्र वरंवट बकालचे नंदकिशोर राठी यांना २ वर्षाचा साधा कारा दंड वास व १० हजार रूपये अशी शिक्षा खामगाव न्यायालयाने सुनावली आहे. या निकालाचे कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यातून स्वागत करण्यात येत आहे.

मिश्र खतामध्ये भेसळ आढल्याने व ते खत आरोपी यांनी आसलगाव येथील दुकानातून विक्रीसाठी ठेवल्याने त्या बाबतचे दोन प्रयोगशाळेचे अहवाल मिळाल्यावर खामगाव येथील न्यायालयाने आज दोन आरोपींना प्रत्येकी २ वर्षाची साधी सजा व १० हजार रूपये दंड ठोठवला आहे. एवढेच नव्हे तर दंड न भरल्यास ३ महिने सश्रम सजा अशी शिक्षा देखील दिली. आरोपी कृषिदेव खत कारखाना अमरावतीचे मॅनेजर पी. व्ही. देशमुख राहणार अमरावती व नंदकिशोर भिकमचंद राठी, राठी कृषी केंद्र वरंवट बकाल यांना ही शिक्षा सुनविण्यात आली आहे.

हे प्रकरण २०१३ रोजी घडले होते. तत्कालिन पंचायत समिती कृषी अधिकारी कार्यालय संग्रामपूर कडून चक्रधर उंद्रे यांनी २८ जून २०१३ रोजी राठी कृषि केंद्र दुकानाची तपासणी केली. त्यामध्ये त्यांना मिश्र खतात अनियमितता आढळली आली. त्यावरून मिश्र खत काढून परीक्षणा करता पाठवले, परीक्षण अहवाल ३१ जुलै २०१३ रोजी प्राप्त होऊन त्यामध्ये मिश्र खतात मानका प्रमाणे नायटरोजन, फोस्पेट व पोटॅश ची मात्र प्रमाणे आढळली नाही. आरोपीनी त्या तपासणी अहवाला विरुद्ध अमरावती कार्यालयात अपील दाखल केले.

यामुळे खताचे नमुने सॅम्पल पुन्हा तपासणी साठी कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील प्रयोग शाळेत पाठवण्यास सांगितले. त्यावरून नमुने हे बंगळूर येथे पाठवले.त्याचा अहवाल हा २६ फेब्रुवारी २०१४ रोजी प्राप्त झाला. त्यामध्ये सुद्धा मानका प्रमाणे मिश्रखत बनवलेले नसल्याचे दिसून आले. त्यावरून १६ डिसेंबर २०१५ रोजी चक्रधर पुंडलिक उद्रे यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करून ‘फर्टीलाजर कंट्रोल ऑर्डर’ कलम नुसार व जीवनावशक वस्तू कायद्याप्रमाणे प्रकरण दाखल केले.

प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अॅड. उदय आपटे यांनी साक्षीदार तपासले. दोन्ही कायद्याच्या तरतुदीवर युक्तीवाद केला तसेच प्रकरण हे शेतकन्यांच्या शेती बाबतच्या संवेदनशील मुद्यावर असून प्रकरणात उंद्रे यांची साक्ष तसेच दोन्ही प्रयोगशाळेचा अहवाल च्या आधारे आज विद्यमान न्यायालयाने दोन्ही आरोपींना कायद्याच्या तरतुदी नुसार प्रत्येकी २ वर्षाची सजा व प्रत्येकी १० हजार रूपये दंड व तो न भरल्यास ३ महिन्याची सजा असा महत्वपूर्ण निर्णय दिला.

‘अभूतपूर्व निकाल’

सरकारी वकील उदय आपटे यांनी सांगितले कि वर नमूद कायद्याखाली खामगाव सत्र न्यायालय मध्ये अशा प्रकारचा पहिलाच न्याय निर्णय झाला आहे. सर्व शेतकरी बांधवाना सदर न्यायनिर्णय समर्पित आहे अशि भावनिक प्रतिक्रिया अॅड आपटे यांनी निकालावर विचारणा केली असता दिली आहे

Story img Loader