बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील लांब पल्ल्याची धावपटू प्रणाली शेगोकार हीने पणजी गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी बजावली आहे. दिग्गज धावपटूंचा मुकाबला करून तिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यासह राज्याचा लौकिक वाढविणाऱ्या प्रणालीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिनी सर्व जिल्ह्यांत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरावरील विजेत्यांना राज्य स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. ही स्पर्धा ५ ऑक्टोबर रोजी पुणे येथे पार पडली. या स्पर्धेत मुलींमध्ये अव्वल ठरलेली प्रणाली ही राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू”, सुधीर मुनगंटीवार असे का म्हणाले…

गोवा येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिचा तृतीय क्रमांक आला. ग्रामिण भागाची पार्श्वभुमी असतानासुध्दा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये तिने मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. दरम्यान राज्य संस्था मुंबईचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. प्रसाद भंडारी यांनी प्रणालीचे अभिनंदन केले आहे. संस्थेच्यावतिने तिचा जागतिक एड्स दिनाच्या दिवशी सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांमध्ये एच.आय.व्ही, एड्स जनजागृतीसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून सन्मान करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनीसुध्दा प्रणालीचे कौतुक केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana athlete pranali shegokar 3rd rank in national marathon competition held in goa scm 61 css
Show comments