बुलढाणा : बुलढाणा लोकसभेतील भाजप बंडखोर उमेदवार विजयराज शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत बावनकुळे यांनी, अर्ज मागे घ्या, युतीधर्माचे पालन करा’ असे कडक निर्देश दिले. दरम्यान आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या सोमवारी निर्णय घेणार असल्याचे शिंदे यांनी ‘लोकसत्ता ‘ सोबत बोलताना सांगितले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील या बैठकीत उपस्थित होते. यावेळी विजयराज शिंदे यांनी तक्रारींचा पाढाच वाचल्याचे वृत्त आहे. याशिवाय मंत्री गुलाब पाटील, आ. संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानांची माहितीही बावनकुळेंना दिली. आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार केली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असून ३ आमदार आहे. भाजपच्या पाठिंब्यावर मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्यावी, अशी विनंती देखील शिंदेंनी बावनकुळे यांच्याकडे केली. मात्र, बावनकुळे यांनी युतीधर्म महत्वाचा असून, ‘तुमच्या ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत त्यांना समज देऊ ‘असा शब्द दिला. आपण भरलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, युतीधर्माचे पालन करून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा, अशा सूचना बावनकुळे यांनी विजयराज शिंदेंना केल्या.
तब्बल १ तास चाललेल्या या बैठकीतूनच चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवरून संपर्क करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिंदे यांचे म्हणणे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही शिंदे यांची फोनवरून चर्चा झाली.
हेही वाचा…‘शिंदें’चा भाजप बंडखोर शिंदेंना फोन, गिरीश महाजन बुलढाण्यात; महायुतीतील नाराजीनाट्य चिघळले…
माघारीच्या अंतिम दिवशी फैसला
या संदर्भात उद्या, सोमवारी बुलढाण्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असे विजयराज शिंदे यांनी सांगितले. अर्ज मागे घेण्याची उद्या ८ एप्रिल ही अंतिम मुदत आहे. उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. यामुळे शिंदे माघार घेतात की बंडाचा झेंडा कायम ठेवतात? याकडे बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.