बुलढाणा: बुलढाणा सायबर पोलिसांनी चमकदार कामगिरी करीत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघा नायजेरियन नागरिकांना दिल्ली येथून ताब्यात घेतले.
मेहकर येथे ‘पॅथॉलॉजी लॅब’ चालवणाऱ्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी तब्बल ६५ लाखांनी गंडविण्यात आले होते. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दीपक शिवराम जैताळकर यांचे मेहकर शहरामध्ये जीवनज्योती क्लिनिक आहे. त्यांना काही महिन्यापूर्वी आपल्या फेसबुक वर मारिया जोन्स या फेसबुक अकाउंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. ऑनलाईन चॅटिंग दरम्यान व्हाट्सअप क्रमांकाची देवाणघेवाण झाली.
हेही वाचा… अमरावती: शेतातील विद्युत कुंपणाने केला घात; विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
दरम्यान, या अकाउंट वरून एक गिफ्ट पाठविले असून पार्सल दिल्ली विमानतळ येथून सोडवून घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला. अज्ञात व्यक्तीने ६५ हजार रकमेचे ब्रिटिश पाउंड देण्याच्या नावाखाली इतर कागदपत्रे काढण्यासाठी वेगवेगळ्या तारखेत रक्कम भरायला लावली. ६५ लाखांची रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची तक्रार जैताळकर यांनी बुलढाणा सायबर क्राईम पोलीस ठाण्यात दिली होती. सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.