बुलढाणा : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज झालेल्या मतदानात बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्ह्यातून ‘शत प्रतिशत’ मतदान झाल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी खरगे व शशी थरूर यांच्यात लढत आहे. आज सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मुंबई येथील टिळक भवनात मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील २४ प्रदेश प्रतिनिधींनी मतदान केले. यामध्ये दिलीपकुमार सानंदा, जयश्री शेळके, श्याम उमाळकर, रिझवान सौदागर, संजय राठोड, ज्ञानेश्वर पाटील, हर्षवर्धन सपकाळ, गणेश पाटील, विजय अंभोरे, लक्ष्मण घुमरे, राजेश एकडे, रशीदखान जमादार, अरविंद कोलते, प्रकाश अवचार, रामविजय बुरुंगले, स्वाती वाकेकर, मनीषा पवार, ज्योती ढोकणे, ज्योती पडघान, सुधाकर धमक, मनोज कायंदे, अनंत वानखेडे, महेश जाधव, हरीश रावळ यांचा समावेश आहे. जिल्हा काँग्रेसवर ज्येष्ठ नेते खासदार मुकुल वासनिक यांचा प्रभाव आहे. मतदारांपैकी बहुतेक जण त्यांचे समर्थक व निष्ठावान आहेत. तसेच खरगे यांच्या उमेदवारी अर्जात वासनिक सूचक होते. यामुळे जिल्ह्यातून खरगे यांना पाठबळ मिळण्याची दाट शक्यता आहे.