बुलढाणा : आज शनिवारी अटक करण्यात आलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, या निर्णयाचे तुपकरांनी स्वागत केले असून ‘सत्य परेशान हो सकता हैं पराजित नही,’ अशी प्रतिक्रिया माध्यमांसोबत बोलताना दिली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
आज दुपारी निवासस्थानी ताब्यात घेण्यात आल्यावर तुपकरांना बुलढाणा शहर पोलिसांनी ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याचे हिंसक पडसाद जिल्ह्यात उमटले. दरम्यान, बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.
First published on: 25-11-2023 at 20:52 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana district and sessions court granted bail to farmer leader ravikant tupkar scm 61 amy