बुलढाणा: जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १० ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या गुलाबी थंडीप्रमाणे पहिल्या टप्पात थंड मतदान झाले आहे. पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी ९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष मतदार आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायततींच्या सार्वत्रिक व थेट सरपंच पदाकरिता तसेच १० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज १८२ केंद्रांवरून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० वाजेदरम्यान मतदारांचा निरुत्साह दिसून आला. तुरळक संख्येने मतदान करण्यात आले. दोन तासांच्या पहिल्या टप्पात सार्वत्रिकमध्ये सरासरी ८.५५ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण ९६ हजार ९७० पैकी जेमतेम ९२६१ मतदारांनीच मतदान केले. देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, मेहकर, संग्रामपूर तालुक्यातील मतदान किंचित म्हणजे १० टक्केच्या आसपास होते. पोटनिवडणुकीत ११ टक्के मतदानाची नोंद झाली.

हेही वाचा – मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ही मोहीम असावी – नितीन चौधरी

थेट जनतेतून ४८ सरपंच निवडले जाणार असून, ३०१ जागांकरिता मतदान घेतले जाणार आहे. मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष आणि चार कर्मचारी असे ४८ ठिकाणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा – रेल्वेतून विनातिकीट प्रवास महागात! ५ कोटी ६४ लाखांचा दंड वसूल

अविरोध अन अर्जच नाही

४८ ग्रामपंचायतींच्या ४४२ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार होती. मात्र, १२७ जागांवर सदस्य बिनविरोध निवडून आले. १४ जागांसाठी नामनिर्देशनपत्रेच प्राप्त झाली नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष ३०१ जागांकरिता निवडणूक होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana district gram panchayat election only 9 percent voting in the first phase scm 61 ssb