बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातही सातही मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.६४ टक्के पेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली आहे. दोन मतदारसंघात तर अर्धेअधिक मतदान झाले आहे. यामुळे जिल्ह्यात उत्साही मतदानाची नोंद होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील ७ मतदारसंघासाठी आज बुधवारी,२० नोव्हेंबरला सकाळी सात वाजेपासून मतदान सुरु झाले. २१ लाख ३४ हजार ५०० मतदारांसाठी असलेल्या २२८८ मतदान केंद्रावरून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळच्या गारठ्यात संथ गतीने मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात म्हणजे सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान केवळ ६.१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण २१ लाख३४हजार ५०० पैकी १लाख ३१हजार ४७७ मतदारानीच हक्क बजावला. उर्वरित सुमारे वीस लाख मतदार मतदान केंद्राकडे फिरकलेच नाही.

Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार
Shirdi Political Party Convention Venues Coincidence Discussion
शिर्डीस लागती राजकीय पाय! पक्षीय अधिवेशन स्थळांच्या योगायोगाची चर्चा

हेही वाचा…नाईक तलाव परिसरात पैशाच्या पाकीटांचा साठा… काँग्रेसचे कार्यकर्ते…

सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्याच्या मतदानाची आकडेवारी १९ (१८.१८) टक्केच्या घरात पोहोचली. दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी टक्केवारी ३२ .९१ टक्केपर्यंत पोहोचली. तीन वाजेपर्यंत ही टक्केवारी ४७.४९ टक्केवारी पर्यंत गेली. यातही मेहकर (५१.८०), खामगाव ( ५१.०७) या मतदारसंघात अर्ध्यापेक्षा जास्त मतदान झाले होते. १० लाख १३ हजार ५७२ जनांनी मतदान केले.यामुळे सहा वाजेपर्यंत उत्साही मतदानाची नोंद होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा…मेळघाटातील सहा गावांचा मतदानावर बहिष्‍कार, ‘हे’ आहे कारण…

नेत्यांची परिवारासह हजेरी

मतदारांप्रमाणेच नेते मंडळीतही मतदानाचा उत्साह दिसून आला. बहुतेक नेत्यांनी सकाळी आणि आपल्या परिवारासह मतदान करण्यास पसंती दिल्याचे दिसून आले.केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि पत्नी राजश्री जाधव यांच्या समावेत त्यांचं मूळ गाव असलेल्या मादणी येथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. मादणी हे गाव बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघात आहे . चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी आपले पती विद्याधर महाले यांच्यासमवेत मतदान केले. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील केंद्रात सपत्नीक मतदान केले. विधानपरिषद सदस्य धीरज लिंगाडे यांनी बुलढाणा येथील शिवाजी विद्यालयात मतदान केले. बुलढाणा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी आपले पती, उद्योजक सुनील शेळके यांच्यासह मतदान केले.

Story img Loader