बुलढाणा : कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे उपदान देण्यास अक्षम्य टाळाटाळ केल्याने एसटी महामंडळाचे बुलढाणा विभागीय कार्यालय आज, गुरुवारी संध्याकाळी उशिरा ‘सील’ करण्यात आले. यानंतरही महामंडळ ताळ्यावर आले नाही तर, कार्यलयाच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याने महामंडळाचे मुख्यालय हादरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – राष्ट्रपती दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर, काय आहेत कार्यक्रम?

हेही वाचा – यवतमाळ : सत्ताधारी गांजा पिऊन नुकसानीची पाहणी करतात का? शेतकऱ्यांच्या ‘सोटा’ मोर्चात….

१९ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे तब्बल ५३ लाख रुपये महामंडळाकडे थकीत आहे. उच्च न्यायालयाने मागील २५ सप्टेंबर रोजी रक्कम अदा करण्याचे आदेश पारित केले होते. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही महामंडळाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे त्यांची जमीन जप्त करून आज शासनाच्या नावे करण्यात आली. तसेच तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने मलकापूर मार्गावरील विभागीय कार्यालय सील केले. उद्या, शुक्रवारपर्यंत धनादेश दिला नाही तर जप्त जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मुख्यालय प्रशासन व बुलढाणा विभाग हादरला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana divisional office of st corporation was sealed scm 61 ssb
Show comments