बुलढाणा : जनतेचा रक्षक असलेल्या पोलीस हवालदाराने कायद्याचे ज्ञान असतानाही त्याच्या पत्नीला मोबाईलवर तीनदा तलाक असे सांगून कथितरित्या घटस्फोट देऊन टाकला. तसेच पत्नी आणि वृद्ध मातेला जीवे मारण्याची धमकी देत राहते घर सोडून देण्यास फर्मावले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपल्या कथित प्रेयसीसाठी त्याने हा उपद्याप करून स्वत:वर कारवाईचे संकट ओढून घेतले आहे. दानिश देशमुख असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो मलकापूर (जि. बुलढाणा) येथे पोलीस हवालदार या पदावर कार्यरत आहे. या घडामोडीमुळे हवालदिल झालेल्या त्याच्या पीडित पत्नीने प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली आहे. यावरून आरोपी हवालदार दानिश देशमुख विरुद्ध मुस्लीम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा २०१९ च्या कलम ३ आणि ४, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या ११५(२), ३५२ आणि ३५१ (२) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता पत्नी हिना दानिश देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी ही कारवाई केली. तक्रारीनुसार मपती दानिश देशमुख मलकापूर येथे पोलीस विभागात कार्यरत आहे.
हेही वाचा – बांगलादेशातील हिंदू अत्याचारांविरुद्ध महत्त्वाचा निर्णय, आता यापुढे…
सन २०११ मध्ये त्यांचे अजिंठा (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे मुस्लिम रितीरिवाज प्रमाणे लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आहेत. लग्न झाल्यापासून दानिश याने पत्नीचा छळ केला. मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते, माझे जबरदस्ती लग्न लावून दिले आहे, असे सांगतो. नेहमी शारीरिक व मानसिक त्रास देवून नेहमी शिवीगाळ करत असे तसेच दारु पिऊन सतत मारहाण करत असे. त्याचे विवाहबाह्य संबंध असून सासूला आणि मला घरातून काढून टाकण्याच्या धमक्या देत असतो. घटनेच्या वेळी मला आणि सासूला फोन आला आणि त्याने तात्कळ घर खाली करण्याची धमकी देत शिवीगाळ केली. त्याच्या प्रेयसीला तिथे राहावयाचे आहे. याआधीच त्याने २ वेळा ‘तलाक ए हसन’ची नोटीस दिली आहे. यावेळी कळस गाठत तुला आताच तीन तलाक देत आहे व जोरजोराने तीन वेळा ओरडून एकाच वेळी तीन तलाक दिला. लग्नसंबंध आज रोजी संपुष्टात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा – दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे, अखेर पतीने चक्क ॲसिड…
पीडित पत्नीने सदर तलाक मान्य नसल्याचे सांगून अश्या पद्धतीने तलाक देवु शकत नाही. लग्न संपुष्टात येवू शकत नाही. घरात दोन लहान मुली वयोवृद्ध सासू आहे. मात्र त्याने काहीही ऐकून न घेता तीन तलाक घोषित केला आहे. वास्तविक पाहता अचानकपणे तीन तलाक देणे हे बेकायदेशीर आहे. त्याच्यावर या आधीसुद्धा अदखलपात्र गुन्हा दाखल आहे, असे त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रकाश बाजड हे करीत आहे.