बुलढाणा : सरोवरनगरी लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात आज सोमवारी पहाटे अग्नितांडव पाहायला मिळाले. ग्रामीण रुग्णालयातील जनरल वॉर्डमधील एका रुग्णाचा यात जळून कोळसा झाला. सदर मनोरुग्ण हा पैठण येथील रहिवासी होता. त्याचे नाव हरिभाऊ रोकडे, असल्याचे सांगितले जाते. कर्मचाऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२२ डिसेंबरच्या दुपारी लोणार बसस्थानकावरून अत्यावस्थ अवस्थेतील एका मनोरुग्णाला लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आले होते. सुरुवातीला त्याने त्याची ओळख सांगितली नाही, मात्र त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने त्याचे नाव हरिभाऊ रोकडे (रा. पैठण, संभाजीनगर) असल्याचे सांगितले होते. त्याला त्याच्या नातेवाईकांबद्दल विचारणा केली असता, या जगात आपले कुणीही नाही, असे तो सांगत होता. तपासणीनंतर सदर मनोरुग्णावर ग्रामीण रुग्णालयातील जनरल वॉर्डात उपचार सुरू होते.
हेही वाचा – यवतमाळ : शिस्तप्रिय भाजपमध्ये धुसफूस…मंत्र्याच्या सत्कार समारंभातच…
दरम्यान, रात्री कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वॉर्डमधून धूर निघताना दिसला. कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असता सदर मनोरुग्ण पलगांवर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला होता. कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मनोरुग्णाचा जळून कोळसा झाला होता. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, ही आग मनोरुग्ण विडी पीत असल्याने लागली, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याची पुष्टी होऊ शकली नाही. ही आग कदाचित शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यताही नाकारता येत नाही. लोणार पोलीस आणि रुग्णालय व्यवस्थापन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आगीचे नेमके कारण तपासत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.
थरारक घटनाक्रम
रात्रपाळीत कर्तव्यावर असलेले सुरक्षारक्षक उद्धव वाटसर यांना सोमवारी पहाटे ३ वाजून २० मिनिटांदरम्यान एका वॉर्डातून धूर निघत असल्याचे दिसून आले. वाटसर यांनी तत्काळ रुग्णालयातील संबधितांना याबाबत कळविले. अधिपरिचारक विष्णू खरात यांनी शर्थीचे प्रयत्न करीत इतरांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. दरम्यान, एका बेडला आग लागून त्यावरील रुग्ण आगीत होरपळत असल्याचे त्यांना दिसून आले. आग आटोक्यात येईपर्यंत रुग्णाचा जळून मृत्यू झाला होता.
हेही वाचा – देणी लाखभर पैसे दिले टिचभर, बांधकाम खात्याचे काम कसे चालणार ?
अधिपरिचारकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
कर्तव्यावर असलेले अधिपरिचारक विष्णू खरात यांनी सैनिक प्रशिक्षणाचा अनुभव पणाला लावत इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचे सहा सिलिंडर वापरून आगीवर नियंत्रण मिळविले. अन्यथा आगीने संपूर्ण रुग्णालय कवेत घेतले असते.