बुलढाणा : दारूचे व्यसन सोडविण्याच्या नावाखाली एका युवकास निर्दयीपणे मारहाण करणाऱ्या तालुक्यातील कथित महाराज विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. याला काही तास लोटत नाही तोच ‘त्या’ भोंदू बाबाचा आणखी ‘मारहाण- नामा’ बाहेर आला आहे. त्याचा दुसरा ‘व्हिडीओ’ समाज माध्यमावर ‘व्हायरल’ झाला असून तो कथितरित्या भूतबाधा झालेल्या महिलेला निर्दयीपणे मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे राजमाता जिजाऊंच्या पुरोगामी बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दारू सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला महाराजाकडून बेदम मारहाण करण्याची चित्रफित २४ जून रोजी समाज माध्यमावर सार्वत्रिक झाली होती. या घटनेची पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना दिले होते. यामुळे ठाणेदारांनी मारहाण होणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. या प्रकरणी निर्दयीपणे मारहाण करण्यात आलेल्या मराठवाड्यातील राजेश राठोड (राहणार माळेगाव तालुका मंठा जिल्हा जालना) याने रायपूर पोलीस ठाण्यात येऊन काल शनिवारी ( दिनांक २९) रीतसर तक्रार दिली होती. प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात शिवाजी पुंडलिक बरडे उर्फ शिवा महाराज (राहणार घाटनांद्रा तालुका बुलढाणा) याच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ३२३, २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास वेगाने करण्यात येत आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
Dhananjay Deshmukh News
Dhananjay Deshmukh : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिलाय..”, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले?
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
akola woman brutally murdered on Old Hingana Road
आधी गळा आवळला, मग रस्त्यावर डोके आपटले; ‘मॉर्निंग वॉक’साठी गेलेल्या महिलेची हत्या
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा

हेही वाचा – Video : वाघिणीने केली रानगव्याची शिकार.. आणि बछड्याने मारला ताव

आता महिलेवर अघोरी उपचार

महाराजाचा हा अघोरी उपचार आणि निष्ठुर मारहाण जिल्ह्यासह राज्यात गाजत असतानाच आज रविवारी ( दिनांक ३०) दुपारी महाराजांचा एक नवीन ‘व्हिडिओ’ समाज माध्यमावर ‘व्हायरल’ झाला आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये भोंदू बाबा एका महिलेस निर्दयीपणे आणि तिचे केस गच्च धरून मारहाण करताना दिसत आहे. या चित्रफितमधील संभाषणावरून, महाराज त्या महिलेच्या अंगातील भूत उतरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते. या अघोरी उपचाराला बळी पडणारी महिला कोण व कुठली आहे? याचा आज संध्याकाळपर्यंत उलगडा झाला नाहीये! आता महाराजावर पोलीस विभागाकडून केव्हा आणि काय कारवाई केली जाते? याकडे संतप्त जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. विविध महिला संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या महिला आघाडीकडून आवाज उठविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘अंनिस’ मैदानात

दरम्यान या प्रकरणात आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती मैदानात उतरली आहे. महाराजावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्याची मागणी समितीने केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील घाटनांद्रा येथील कथित बुवाने एका महिलेच्या अंगातील भूत उतरवण्याच्या कारणावरून तिला मारझोड करणे, तिचे केस ओढणे, हा महाराष्ट्र शासनाच्या जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत अनुसूची १ नुसार गुन्हा आहे. या महाराजावर तात्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि बाबाला अटक व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवक्ते किशोर वाघ यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे.

हेही वाचा – सोमवारपासून देशातील जंगल सफारीला टाळे लागणार

‘एसपी’ कडासने म्हणतात, कारवाई करूच…

भूतबाधा उतरवण्याचा उपचार करीत असल्याचा सार्वत्रिक चित्रफित प्रकरणाची पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांना ही भयावह आणि चीड आणणारी चित्रफीत प्राप्त झाली आहे. याप्रकरणीसुद्धा शिवा महाराजावर रायपूर पोलीस ठाण्यात कारवाई करू, अशी ग्वाही सुनील कडासने यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Story img Loader