बुलढाणा: अज्ञात भामट्याने खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथील एका माहिती तंत्रज्ञान (आयटी) अभियंत्याला तब्बल अठ्ठावीस लाखांनी गंडविल्याचे खळबळजनक वृत्त आहे. रजत नगरी म्हणून ओळख असलेल्या खामगाव शहरातील घाटपुरी नाका भागातील आर. के. व्यापार संकुलात आयटी इंजिनिअर अभिषेक अशोक कलंत्री (वय पस्तीस वर्षे) वास्तव्यास आहे. त्यांची तब्बल २८ लाखाने फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आयटी अभियंता अभिषेक अशोक कलंत्री यांना बारा जून रोजी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरुन संपर्क साधला. यानंतर औपचारिक बोलणे झाल्यावर भामट्याने ‘तुमचे डीएचएलसींस कंपनीमध्ये संशयास्पद पार्सल असल्याचे सांगून त्यांना प्रभावित करून जाळ्यात ओढले. यासाठी तुम्ही तातडीने मुंबई येथील ‘नार्कोटीक कंट्रोल ब्युरो’ विभागात तक्रार करा’ असेही त्याने सांगितले. अंमली पदार्थ विभागाकडे तक्रार करण्यासाठी स्कीप या मोबाईल ॲपचा वापर करा, अशी सूचना फोनवरून बोलणाऱ्याने केली. या अनोळखी व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे अभिषेक कलंत्री यांनी सदर ‘ॲप डाऊनलोड’ केले. यानंतर अल्पावधीतच संबंधित अज्ञात व्यक्तीने या ॲपच्या आधारे कलंत्री यांना त्यांच्या मोबाईलची ‘स्क्रीन शेअर’ करण्यास सांगितली. या सुचनेचे पालन करताच भामट्याने त्याद्वारे कलंत्री यांच्या मोबाईलचा ‘ऑनलाईन ताबा’ घेऊन टाकला! त्या आधारे कलंत्री यांच्या बँक खात्यातून तब्बल अठरा लाख पंधरा हजार दोनशे शेहचाळीस रुपयांची मोठी रक्कम इतर खात्यात वळती केले. यावरच न थांबता संबंधित अज्ञात भामट्याने कलंत्री यांच्या ‘क्रेडीट कार्ड’द्वारे दहा लाख रुपयांचे कर्ज परस्पर घेऊन टाकले. एवढेच नव्हे तर ती दहा लाखांची रक्कम घेवून ते पैसे देखिल इतर खात्यात वळती केले. काही मिनिटांतच ऑनलाईन पद्धतीने त्याने अभियंता कलंत्री यांची तब्बल २८ लाख १५ हजार २४६ रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केली.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात

हेही वाचा – मोसमी पाऊस २० जुननंतर पूर्णपणे सक्रिय होणार

दरम्यान काही वेळानंतर हा बनवाबनविचा प्रकार लक्षात आल्यानंतर अभिषेक कलंत्री यांना जोराचा मानसिक धक्काच बसला! अनेक वर्षांची कठोर मेहनतीची लाखो रुपयांची रक्कम काही वेळातच गेल्याने कलंत्री यांना काही वेळ काय करावे हेच सुचले नाही. यातून भानातून आल्यावर कुटुंबातील सदस्य, ओळखीच्या पोलिसांशी चर्चा करून विचारविनिमय केला. यानंतर कलंत्री यांनी बुलढाणा शहर गाठले. घटनेची तक्रार बुलढाणा येथील सायबर पोलीस ठाण्यात दिली. प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४१९, ४२० आणि तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा – आनंदवार्ता…विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार! महामंडळ म्हणते…

सायबर गुन्ह्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ

दरम्यान माहिती तंत्रज्ञानचा जेवढ्या वेगाने प्रसार आणि प्रचार होत आहे तेवढ्याच वेगाने ऑनलाईन किंवा सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. यात ऑनलाईन फसवणुकीत वाकबगार असलेल्या व्यक्ती वा सुसज्ज टोळ्या एकाच वेळी लाखोंनी संबधित व्यक्तीस गंडावत आहे. जिल्ह्यात दर महिन्यात अश्या किमान दोन घटना घडत आहे. नुकतेच चिखली शहरातील एका शिक्षकास ऑनलाईन शेअर मार्केटमधून अल्पकाळात कैक पटीने लाभ मिळवून देण्याची हमी देण्यात आली होती. त्याची लाखोंनी फसवणूक झाल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला होता. फसवणूक होणाऱ्यामध्ये तथा कथित उच्च शिक्षित व्यक्तींचे प्रमाण जास्त आहे. आजच्या घटनेतील व्यक्ती आयटी अभियंता असल्यावर जाळ्यात फसल्याने ही बाब सिद्ध होते.