बुलढाणा : राज्याच्या मंत्री मंडळात जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांचा वर्णी न लागल्याने मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते संतप्त झाले असून रस्त्यावर उतरले. त्यांनी नागपूर कडे प्रस्थान करून पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याचा निर्धार केला. दरम्यान, याची माहिती मिळताच नागपूर मध्ये असलेले आमदार संजय कुटे यांनी ‘व्हिडीओ कॉल’ द्वारे दीर्घ संबोधन करून त्यांची समजूत घातली. तुम्ही नागपूर ला येऊ नका, मीच जळगावला येतो असे कार्यकर्त्यांना साकडे घालून मंत्री पद म्हणजे सर्व काही नाही. तुम्ही नागपूरला आले तर मलाच त्रास होईल, असे त्यांनी सांगितल्यावर कार्यकर्त्यांनी नागपूर ला जाण्याचा निर्णय मागे घेतला. यामुळे आमदार कुटे यांना मंत्री पद नाकारल्याने जळगाव मतदारसंघात नाराजीचे वादळ उठल्याचे चित्र आज दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करत असलेले जळगाव जामोदचे भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने जळगाव जामोद मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आज सोमवारी, १६ डिसेंबर रोजी आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी मतदारसंघाचा केंद्रबिंदू असलेल्या जळगाव नगरीत तालुक्यासह, संग्रामपूर आणि शेगाव नगरीतील कार्यकर्ते जमले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार कार्यकर्ते एकत्र येऊन नागपूरकडे जाण्याच्या तयारीत असतानाच आमदार संजय कुटे यांनी व्हिडिओ कॉल द्वारे त्यांच्याशी संवाद साधला. कार्यकर्त्यांची समजूत काढत कार्यकर्त्यांना शांत राहून संयम बाळगण्याचे कळकळीचे आवाहन केले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नागपूरकडे जाण्याचा निर्णय स्थगित केला आहे.

हेही वाचा : Yavatmal Crime News: विद्यार्थिनी १० दिवसांपासून होती बेपत्ता, अखेर दगडाने ठेचलेल्या…

काय म्हणाले आमदार कुटे…

ऑनलाइन संवाद साधताना आमदार कुटे म्हणाले की, ‘मंत्रीपद म्हणजे सर्व काही नाही, आकाश (फुंडकर) माझा लहान भाऊच आहे, त्याला पद मिळाले म्हणजे मलाच मिळाले असे आहे. मी असो की आकाश सारखेच आहे. उलट मी आमदार असल्याने २४ तास आपल्यासाठी उपलब्ध राहील, आपल्या मतदारसंघाच्या चौफेर विकासावर पूर्णपणे ‘फोकस ‘करता येईल.

हेही वाचा : वाघासोबत फोटोसेशन ! लोकांनी पुन्हा वाघाला घेरले…

भाजप नेत्यांवर राग काढू नका

तुम्हाला जो काही राग काढायचा तो माझ्यावर काढा, भाजप नेत्यांवर नका काढू, जाहीर नाराजी व्यक्त करू नका. पक्ष विरोधी वक्तव्ये करू नका. आपण एका सुसंस्कृत, शिस्तबद्ध पक्षाचे पाईक आहोत. त्यामुळे जाहीर बोलण्याचे टाळा, माझ्या भावना समजून घ्या असे सांगून तुम्ही चुकीचे वागलात तर मला जास्त त्रास होईल, असेही आमदार कुटे या ऑनलाइन संवादात पुढे म्हणाले.