बुलढाणा : कडक तापमान लक्षात घेता बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच ‘रांग विरहित’ मतदानाचा अवलंब करण्यात येणार आहे. यासाठी मतदारांना टोकन देण्यात येणार असल्याने एकावेळी रांगेत फक्त पाच मतदार उभे राहणार आहे. उर्वरीत मतदारासाठी केंद्रांच्या बाजूलाच ‘प्रतीक्षालय’ उभारण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाण्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र जिल्ह्यात सद्या ४१ ते ४२ डिग्री सेल्सिअस इतके तापमान असून ते वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मतदारांची सुविधा व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. यंदाच्या मतदानात प्रथमच टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. केंद्रावर येणाऱ्यांना टोकन देण्यात येणार आहे. एकावेळी फक्त पाच मतदार रांगेत उभे राहतील तर उर्वरीत टोकनधारक मतदारांसाठी केंद्राच्या बाजूच्या खोलीत बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेही वाचा – अजित पवार म्‍हणाले, “शेतकऱ्यांना मदत दिली नाही, तर चले जाव म्‍हणा”

टोकन क्रमांकानुसार मतदानासाठी रांगेत सोडण्यात येणार आहे. महिला आणि पुरुषांना वेगळे टोकन देण्यात येणार आहे. केंद्रावर आल्यानंतर मतदारांना टोकन देण्यात येतील. पाच मतदारांना रांगेत ठेवण्यात येणार असून उर्वरीत मतदारांसाठी केंद्राच्या बाजूच्या खोलीत बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी पंखे, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी खुर्च्या आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. या माध्यमातून रांगविरहित मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

दिव्यांग व्यक्ती सक्षम ॲपवरून मतदान केंद्रावर येणे-जाणे आणि व्हीलचेअरची मागणी नोंदवू शकतील. अंध मतदारांना ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. मतदान यंत्रावर निळ्या बटनाशेजारी ब्रेल लिपीतील क्रमांक असणार आहे. यंत्रावरील क्रमांक तपासून अंध मतदार मतदान करू शकतील. दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना आवश्यकतेप्रमाणे मदतनीस पुरविण्यात येणार आहे.

हेही वाचा – जे पी नड्डा म्हणतात, “इंडिया आघाडी म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांना वाचविणारी…”

तापमानामुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास उपचार करण्यासाठी मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक उपस्थित राहणार आहे. पथकाकडे आवश्यक औषध साठ्यासह मेडीकल किट उपलब्ध राहणार आहे. ओआरएस आणि इतर औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार आहे. तसेच चार किंवा त्यापेक्षा जास्त मतदान केंद्र एकाच इमारतीमध्ये असणाऱ्या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर मंडप उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पंखे, खुर्च्या, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana lok sabha election this year queueless voting find out what the plan is scm 61 ssb
Show comments