बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक गल्ली ते दिल्ली गाजली. युतीच्या उमेदवारीचा तिढा दिल्लीपर्यंत गेला. ही चुरस नाट्यमय मतदान अंती सुद्धा कायम असल्याचे मजेदार चित्र आहे. २६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या निर्णायक टप्यात म्हणजे संध्याकाळी चार वाजता ठिकठिकाणी अर्धाएक तास अवकाळी वादळी पाऊस झाला. याचा फटका मतदानाला बसला. यातच लग्नाची दाट तिथी असल्याचा परिणामही जाणवला. यामुळे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत एकूण मतदान ५३ टक्केच्या आसपास होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

परिणामी मतदान फारतर ५९ ते ६० टक्केपर्यंत जाईल असा व्यापक अंदाज होता. अंतिम आकडेवारी मिळायला दुसऱ्या दिवशीची शनिवारची संध्याकाळ उजाडली. यामुळे कमी मतदान व ६० टक्केचा अंदाज गृहीत धरून युतीचे प्रतापराव जाधव, आघाडीचे नरेंद्र खेडेकर व अपक्ष रविकांत तुपकर यांच्या विजयाची आकडेमोड मांडणे, अंदाज व्यक्त करण्याचा सिलसिला सुरू झाला. कमी मतदान म्हणजे युतीला धोका आणि खेडेकर व तुपकर यांच्यात विजयाची शर्यत या अंदाजाची वादळी चर्चा मतदारसंघात २६ च्या रात्रभर सुरू होती. युतीच्या गोटात काहीशी अस्वस्थता दिसून आली.

हेही वाचा…नवविवाहितेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून छळ

युतीचे दोन्ही स्थितीत विजयाचे दावे

मात्र युती समर्थक हे कबूल करायला अजिबात तयार नव्हते. कमी मतदान म्हणजे आम्हालाच पूरक, आमचे जे गठ्ठा मतदान झाले आहे. भाजप शिंदे गटाचे मतदान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते, मित्र पक्षांचे मतदान झाले आहे, त्यामुळे कमी मतदानातही आमचा विजय पक्का असा दावा युतीकडून करण्यात आला. असाच दावा आघाडी व अपक्ष तुपकर समर्थकांकडून करण्यात आला. या टक्केवारीत खेडेकर व तुपकर यांना विजयाची अधिक संधी असे मानणारे लोक जास्त होते.

वाढीव मतदानातही दावे कायम

दरम्यान शेवटच्या एका तासात तब्बल १ लाख ७४ हजार मतदारांनी धोधो मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६२ पर्यंत गेली. मात्र मतदानाच्या दुसऱ्या दिवशी २७ ला संध्याकाळी ही बाब समोर आली. वाढीव मतदानाचाही आम्हालाच लाभ असा दावा तिन्ही उमेदवाराकडून करण्यात येत आहे. मात्र बहुसंख्य तटस्थ अभ्यासक आणि युती विरोधकही वाढीव मतदान युतीला जास्त लाभदायक असे मानत आहे. खासदार जाधव यांच्या गोटात यामुळें विजयाची ‘गॅरंटी’ वाढल्याचे चित्र आहे. दरवेळी युतीला ४० ते ५० टक्के मताधिक्य देणाऱ्या जळगाव जामोद (६३.५८), खामगाव (६६.२७) या विधानसभेत झालेले लक्षणिय मतदान युतीच्या पथ्यावर पडणारच असा युतीचा भक्कम दावा आहे.

हेही वाचा…लग्नाच्या वरातीत आक्षेपार्ह गाणे; दोन गट भिडले, तिघे जखमी, चार ताब्यात

याशिवाय खासदारांचे गृहक्षेत्र असलेल्या मेहकर( ६४.८४),भाजपचे प्राबल्य असलेल्या चिखली( ६२.२१) या मतदारसंघात झालेले उत्साही मतदान आम्हालाच पूरक ठरेल असा युतीचा दावा आहे. सेनेच्या पारंपरिक मतांना मुस्लिम व आंबेडकरी मतांची साथ यामुळे आघाडीचा विजय निश्चित असल्याचा आघाडीच्या नेत्यांचा दावा आहे. दुसरीकडे वाढीव मतदानातही तुपकर समर्थकांचा विजयाचे गणित वा समीकरण कायम आहे. शेवटच्या तासातील मतदान आमची आघाडी वाढवणारे ठरेल असा त्यांचा दावा आहे. आता तटस्थ जनता काही बोलत नसली, दावे करीत नसली मतदारांनी आपले दावे मतदान मधून मूकपणे व्यक्त केले. त्यांचे दावे ४ जूनच्या दुपारी २ पर्यंत स्पष्ट होतील.