बुलढाणा: अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व तेरा हजार रुपये दंड अशी शिक्षा‌ ठोठविण्यात आली आहे.

मलकापूर  अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही जाधव यांनी हा गुन्हेगारांना जरब बसविशणारा निकाल दिला आहे.

या खटल्याची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे-

पीडित मतिमंद  मुलगी शौचालयासाठी जात  होती. तेव्हा आरोपी सुरेश भगवान संबारे (राहणार बेलाड, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा)याने तिला  पकडून झोपडीत नेत तिच्यवर  लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी  मलकापूर शहर पोलीस ठाणे येथे पीडीतेच्या आईने फिर्याद दिली.यावरून मलकापूर पोलिसांनी  गुन्हा दाखल  केला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करून  विशेष  न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपी हा अटकेपासून कारागृहात होता.

सरकार पक्षातर्फे एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पिडीता, डॉक्टर, पीडितेची आई, तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. या साक्षी ग्राह्य धरून आरोपी सुरेश भगवान संबारे याचे विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे  ॲड.शैलेश हरिहर जोशी  विशेष सरकारी अभियोक्ता यांनी केलेला युक्तिवाद प्रभावी ठरला. आरोपी सुरेश भगवान संबारे यास पोक्सो कायद्याचे कलम ६ नुसार २० वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड न भरल्यास, ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा, कलम ४ नुसार १०वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३महिने सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम १० नुसार ५ वर्षे शिक्षा २ हजार रुपये दंड,

दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा कलम १२ नुसार दोन वर्षे शिक्षा व एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची एकूण रक्कम १३ हजार रुपये आरोपीकडून वसूल करून पीडितेस देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांना पीडित नुकसान भरपाई योजनेअंतर्गत अतिरिक्त नुकसान भरपाई ठरवुन पिडीतेस देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गंगाराम ठाकरे यांनी केला.