बुलढाणा : वहिनीने चोरीचा आरोप केला म्हणून डोक्यात लाकडी दांड्याने वार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या दीरास बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीशांनी घटनास्थळाची केलेली पाहणी खटल्याचे एक वैशिष्ट्य ठरले.

२५ जून रोजी आरोपी दीर राजू गवई याला जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मागील २८ डिसेंबर २०२० रोजी ही घटना घडली होती. खटल्याची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे आहे. भादोला( तालुका बुलढाणा) येथील रहिवासी संतोष चिंकाजी गवई यांच्या पत्नी बेबी गवई यांनी दीर राजू गवई याच्यावर चोरीचा आरोप केला. त्यामुळे संतापलेल्या राजूने वहिनी बेबीबाई यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार केला . डोक्यात जबर मार लागल्याने बेबीबाई यांच्या डोक्यातुन रक्तस्त्राव सुरू झाला. त्यावेळी तीचा पती संदीप गवई हा तिथे पोहोचला. संदीपने विचारल्यानंतर राजूने मारहाण केल्याचे बेबीबाई म्हणाल्या. त्यांनतर बेबी गवई यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. २७ डिसेंबर रोजी ही तक्रार देण्यात आली होती. राजू गवई याच्या विरोधात ३०७ कलमेनुसार गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या बेबीबाई यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, २८ डिसेंबर रोजी त्यांचा उपचारा दरम्यानच मृत्यू झाला.

murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
Asaram Bapu Interim Bail from Supreme Court
Asaram Bapu Bail: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
police failed to prove, conviction , accused driving car allegation, mumbai,
बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप : आरोपीच गाडी चालवत असल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश, शिक्षा रद्द
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…

हेही वाचा…जलसंकटाचे काळे ढग कायमच; मागील वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात ५.८६ टक्के घट

त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये कलम ३०२ व कलम ४५२ समाविष्ट केल्या गेल्या. सदर गुन्हयाचा तपास प्रथम पोलीस उपनिरीक्षक रामपुरे, तसेच निरीक्षक नवलकार त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केला. आरोपीविरूध्द पुरेसा पुरावा मिळून आल्याने बुलढाणा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांचेकडे सरकार पक्षाची बाजू मांडण्याची जवाबदारी सोपविण्यात आले.

खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी साक्षीदार संदिप गवई यांचा पुरावा महत्वाचा ठरला. कारण बैबीबाई हिने मृत्यूआधी राजुने हल्ला केल्याचे साक्षीदार संदीप गवई यांना सांगीतले होते. त्यामुळे साक्षीदार संदिप गवई यांचा पुरावा विशेष ठरला. त्याप्रमाणे इतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

हेही वाचा…चंद्रपूर : गाठीभेटी, उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजनांचा धडाका; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी सक्रिय

बचाव पक्षाचा युक्तिवाद आणि घटनास्थळ पाहणी

दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवादात आरोपीच्या बचावासाठी वेगळा मुद्दा मांडला. बेबीबाई गवई ह्या घराच्या टिनावरून लाकडे काढत असताना पडल्या आणि डोक्याला मार लागून त्या मरण पावल्या असा युक्तिवाद आरोपीच्या विधिज्ञांनी केला होता. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी कलम ३१० सी. आर. पी. सी नुसार घटनास्थळाचे अवलोकन करण्याचे आदेश पारीत केले. त्यानुसार सरकारी वकील तसेच आरोपीचे वकिलांना नोटीस देवुन प्रत्यक्षरीत्या घटनास्थळाचे अवलोकन केले.

हेही वाचा…नागपूर : आधीच रस्ते अरुंद, त्यात जड वाहने, शहर बसेसची वर्दळ; अंबाझरी परिसरात वाहतूक कोंडीचा कळस

दस्तरखुद्द न्यायाधीशांच्या अवलोकनानंतर आरोपीचा बचाव योग्य नसल्याचे न्यायनिर्णयात नमूद आहे. आरोपी राजू गवई याच्या विरोधात गुन्हा सिद्ध होत असल्याने भादंविच्या कलम ३०२ मध्ये आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा व ५०० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास २ वर्षापर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच कलम ४५२ भा.दं.वि. मध्ये ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रू. ५०० दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांपर्यंत सश्रम कारावासची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांनी कामकाज पाहिले. बुलडाणा ग्रामीण पोलिसांमधील पोलीस हवलादर बोरकर, झगरे, मिसाळ यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

Story img Loader