बुलढाणा: बुलढाणा बाजार समितीचे मतदान रंगात आले असताना आज दुपारी झालेल्या निसर्गाच्या तांडवाने केंद्रावरील सुविधांचे तीनतेरा वाजले. वादळामुळे शामियान्याची दैना झाली तर तेथील खुर्च्या आडव्या झाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

VIDEO :::

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/04/storm-video.mp4

मंडपाचे लोखंडी खांब घसरले. यामुळे मतदार व विविध पक्षांच्या नेत्यांनी काढता पाय घेतला. कार्यकर्ते मात्र भिजत परिसरात टिकून राहिले. दुपारी सव्वा दोन ते पावणेतीन दरम्यान ही घटना घडली. आधी वादळी हवेने थैमान घातले, नंतर विजांचा कडकडाट सुरू झाला आणि नंतर पावसाने किमान हजेरी लावली. याचा परिणाम मतदान आणि अप्रत्यक्षपणे निकालावर होण्याची चिन्हे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana market committee election due to strong winds the pavilion in front of the voting center was damaged and the chairs were turned upside down scm 61 dvr
Show comments