बुलढाणा : विधानसभेचे अधिवेशन आज सोमवारपासून नागपुरात सुरू झाले आहे. यासाठी सर्वच आमदार उपराजधानीत पोहोचले आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (शिवसेना शिंदे गट)यांनी पहिल्याच दिवशी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना धमाल उडवून दिली. पक्ष विरोधी (युती) कारवायाबद्धल आपण ८ नेत्यांची पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. मी एकट्यानेच नव्हे जिल्ह्यातील विधानसभेच्या अन्य दोन उमेदवारांनी सुद्धा अश्याच तक्रारी केल्याचे सांगून त्यांनी महायुती वर्तुळात खळबळ उडवून दिली.

सोमवारी विधानभवन परिसरात एका खासगी वृत्तवाहिनीसोबत बोलताना आ. गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे ते म्हणाले. यावर संबंधित प्रतिनिधीने ना. प्रतापराव जाधव, डॉ.संजय कुटे यांची तक्रार केली का? असा उलट प्रश्न केला असता ज्या ७ -८ लोकांची तक्रार केली त्यात हे दोघेही आहेत असे आ. गायकवाड बिनदिक्कत म्हणाले.

Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

हेही वाचा : Yavatmal Crime Updates: पतंगाचा दोर, आयुष्याला घोर…. विजेच्या धक्क्याने एका बालकाचा….

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष, मंत्री अमित शहा आदिकडे तर आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्याचा खुलासा आमदार गायकवाड यांनी अन्य प्रश्नाच्या उत्तरात केला. मीच नाही तर मेहकर आणि सिंदखेडराजा मतदारसंघातील आमच्या पक्षाच्या (शिंदे गटाच्या) पराभूत उमेदवारांनी देखील तक्रार केल्याचा गौप्यस्फोट गायकवाड यांनी केला.

मंत्रिपदाचा दावा करणार

मंत्रिपदाबाबत बोलताना आ.गायकवाड म्हणाले की, मी मंत्रिपद मागितले नव्हते त्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही. संजय कुटेंना डावलण्याबाबत आ. गायकवाड यांना छेडले असता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यांना मंत्रीपद मिळेल असे अपेक्षित होते मात्र मिळाले नाही. त्याऐवजी आकाशदादांना मंत्री पद मिळाले. मात्र, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे असे गायकवाड म्हणाले.

हेही वाचा : २ लाखांपर्यंत पुरस्कार जिंकण्याची संधी, नागपुरात प्रथमच होणार चित्रपट महोत्सव

कुटेंवर रोष; फुंडकरांवर मात्र प्रेम

एकीकडे डॉ. संजय कुटेंबद्दल गायकवाड यांनी राग व्यक्त केला असला तरी दुसरीकडे मंत्रीपदाची संधी मिळालेल्या आकाश फुंडकरांबद्दल त्यांनी ममत्व दाखविले. आज गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बुलडाणा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील मंत्र्यालाच संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. फुंडकर यांच्या नावाला पसंती दर्शवली. तशा आशयाचे पत्र गायकवाड यांनी फडणवीस यांना दिले. फुंडकर यांनी तीन वेळा विजय मिळवला आहे. त्यांना जिल्ह्यातील समस्यांची जाण आहे. जिल्ह्यातील समस्यांना ते चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतात.

हेही वाचा : “पोलिसांनी गुन्हा केला तर अधिक कठोर…”, वाचा, जामीन रद्द करताना काय म्हणाले न्यायालय?

बाहेर जिल्ह्यातील मंत्र्यास संधी दिली असता ते ध्वजारोहणाप्रसंगीच उपस्थित राहतात, असा अनुभव आहे. स्थानिक मंत्र्यांना मात्र जिल्ह्याच्या समस्यांबाबत वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नसते. म्हणून फुंडकर यांनाच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संधी द्यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

Story img Loader