बुलढाणा : सहा महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले पंकज भोयर हे आज मंगळवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. संतनगरी शेगाव पुरताच त्यांचा दौरा मर्यादित होता. शेगाव संस्थांनला भेट देऊन गजानन महाराजांचे आशीर्वाद आणि विदर्भातील नागरी सहकारी बँक अंतर्गत उत्कृष्ट बँक स्पर्धाच्या बक्षीस वितरण असा त्यांचा कार्यक्रम होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र त्यांच्यातील ‘शिक्षण राज्य मंत्री जागृत वा दक्ष असल्याने त्यांनी बारावीच्या एका परीक्षा केंद्राकडे अचानक मोर्चा वळवीला!एनवेळी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच कॉपी मुक्त अभियानास सहकार्य करण्याचे आव्हानही केले. त्यांनी या दौऱ्यात शेगांव येथील ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले कला व विज्ञान कनिष् महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला अचानक भेट देऊन परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली.आजपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यादृष्टीने परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा राबविली जात आहे का? याची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही भेट दिली.

कॉपी मुक्त चा आढावा

या पाहणी दरम्यान त्यांनी राज्यात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा व कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माहिती दिली. याशिवाय विद्यार्थ्यांनी शांततेत परीक्षा द्यावी. तसेच परीक्षा केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि पालकांनी कॉपीमुक्त अभियात सहभागी होवून सहकार्य करण्याचे आवाहन केले. सत्कार आलाच या भेटीच्या वेळी प्राचार्या मीनाक्षी बुरूंगले व पर्यवेक्षक शिवाजी निळे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नामदार पंकज भोयर यांचा सत्कार केला . याप्रसंगी शिक्षण विभागचे अधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana pankaj bhoyer minister of state unexpectedly visited 12th examination center scm 61 sud 02