बुलढाणा: सायबर गुन्हेगार अथवा संबधित टोळ्यांचे क्षेत्र आता झारखंड वा उत्तरप्रदेश सारख्या विशिष्ट राज्यापुरते मर्यादित राहिले नसून ते व्यापक झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका सायबर फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीस गुजरात राज्यातून जेरबंद करण्यात आल्याने ही बाब समोर आली आहे. त्यातच ज्या गावाच्या रेल्वे स्थानकावर देशाच्या मोठया नेत्याने लहानपणी चहा विकल्याचे सांगण्यात येते ते वडनागर हे गाव असल्याने सायबर यंत्रणाची कामगिरी अधिकच खमंग चर्चेचा विषय ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत दहा लाख विस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपी अनिल अर्जुन ठाकूर यास ताब्यात घेतले. आरोपी ठाकूर याला जेरबंद करून शनिवारी ( दिनांक तेरा) दुपारी बुलढाणा येथे आणण्यात आले. बुलढाणा सायबर पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. पण आरोपिचे ‘ कार्यक्षेत्र’ हे गुजरात राज्यातील म्हैसाणा जिल्ह्यातील वडनागर आहे. त्यामुळे बुलढाणा सायबर पोलिसांची कामगिरी त्यांच्यासाठीही काहीशी अविस्मरणीय ठरावी.

हेही वाचा : नागपूर : ब्युटीपार्लरच्या नावावर तीन तरुणींकडून देहव्यापार, नेचर ब्युटी सलूनवर एसएसबीची धाड

काय आहे प्रकरण?

बुलढाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड येथील रहिवासी अभिजीत अनिल जाधव (वय एकोणविस वर्षे) यांची चालू वर्षाच्या (२०२४) प्रारंभ चोवीस फेब्रुवारीला एका सायबर ठगसेनाने दहा लाख विस हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती. यामुळे लाखोंचा गंडा बसल्याने अभिजित जाधव हा युवक हादरला! आर्थिक फटका आणि मानसिक धक्का बसलेल्या जाधव यांनी यातून सावरल्यावर थेट बुलढाणा सायबर पोलीस ठाणे गाठले. आपल्या फसवणुकीची हकीकत सांगत त्यांनी रीतसर तक्रार दिली होती. फिर्याद नुसार त्यांची ‘शेअर मार्केट’च्या नावाखाली दहा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी नमूद केले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक शोध घेत आणि तांत्रिक विश्लेषण केले. याआधारे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे ‘लोकेशन’ हे वडनगर (जिल्हा मेहसाणा गुजरात राज्य) हे असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा : बच्‍चू कडू यांची विधानसभा निवडणूक न लढण्याची घोषणा! ठेवली ही अट…

जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात आली.बुलढाणा सायबर पोलीस स्टेशन प्रमुख प्रकाश सदगीर, पोलीस कर्मचारी शकील खान, रामू मुंडे, राजदीप वानखेडे, क्षितिज तायडे व विक्की खरात गुजरातच्या दिशेने रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने आरोपी अनिल अर्जुन ठाकूर याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याला १३ जुलै रोजी बुलढाण्यात आणले . या आरोपीवर बुलढाणा तसेच हैदराबाद येथील फसवणुकीचे देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. अधिक तपासात आणखी काही धक्का दायक माहिती आणि अनिल ठाकुरचे आणखी काही ऑनलाइन कारनामे समोर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा : अकोला: महिला सरपंचाला शिवीगाळ, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर ॲट्राॅसिटी; राजकीय दबावातून गुन्हा दाखल केल्याचा…

झारखंडच नव्हे…

एकेकाळी झारखंड राज्यातील “जामताडा” हे गांव सायबर गुन्ह्यासाठी (कु) प्रसिद्ध होते. मात्र आता ऑनलाइन फसवणुकी मध्ये देशातील इतर शहरांची नावे जुडत आहे. त्यात गुजरात राज्यातील “वडनगर” ची भर पडली आहे. दुसरीकडे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात दूरवरच्या बुलढाणा जिल्ह्यातही वाढ झाली आहे. यात सुशिक्षित आणि कथित उच्च शिक्षितच गंडविले जात आहे, हे विशेष.