बुलढाणा : येथील जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात पार पडलेल्या राज्य कुस्ती स्पर्धेत पुण्याचा रविराज चव्हाण धर्मवीर केसरी पुरस्काराचा मानकरी ठरला. अंतिम सामन्यात त्याने सांगलीच्या धनाजी कोळी याला अस्मान दाखविले! त्यामुळे स्पर्धेत दमदार प्रदर्शन करणाऱ्या कोळीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
खासदार प्रतापराव जाधव यांच्याहस्ते रविराज चव्हाणला चांदीची गदा व १ लाख रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार संजय गायकवाड, ऑलिम्पिक कुस्तीपटू अमीतकुमार दहिया, दोन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेले शिवराज राक्षे, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष गणेश कोहळे, युवासेनेचे मृत्यूंजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. धर्मवीर आखाडा व आ. गायकवाड यांच्यावतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.
हेही वाचा…वय केवळ दोन वर्षे, पण वजन ९०० किलो अन् पाच फूट उंची; कृषी महोत्सवात ‘युवराज’सोबत सेल्फीसाठी झुंबड
पश्चिम महाराष्ट्र, संभाजीनगर, नाशिकचे वर्चस्व
५७ किलो वजनगटात प्रथम नंदु राजपूत (संभाजीनगर), द्वितीय सुशीत पाटील (कोल्हापूर), तृतीय शुभम तोडे (बुलडाणा). ६१ किलो वजनगटात प्रथम सत्यम जगदाळे (संभाजीनगर), द्वितीय दिग्वीजय पाटील (कोल्हापूर), तृतीय नरेंद्र यादव (बुलडाणा). ६५ किलो वजन गटात प्रथम बापू सरगर (पुणे), द्वितीय शैलेश राजपूत (जालना), तृतीय विशाल दुधारे (संभाजीनगर). ७० किलो गटात प्रथम प्रकाश कोळेकर (सांगली), द्वितीय शुभम चव्हाण (कोल्हापूर), तृतीय जगदीश श्रीनाथ (अकोला).
७४ किलो गटात प्रथम शिवम सकपाळ (कोल्हापूर), द्वितीय ओमकार पाटील (कोल्हापूर), तृतीय समाधान नरोटे (बुलडाणा). ८६ किलो वजन गटात प्रथम सतीश राठोड (संभाजीनगर), द्वितीय ऋषीकेश जरारे (संभाजीनगर), तृतीय करम धनवट (संभाजीनगर). महिला गटामध्ये ५० किलो गटात प्रथम अनुष्का हापसे (पुणे), द्वितीय वैष्णवी सूर्यवंशी (अकोला), तृतीय समीक्षा पवार (नाशिक). ५३ किलो गटात प्रथम सोनाली शिंदे (पुणे), द्वितीय तुळशी पाथरे (नाशिक), तृतीय भारती टेकाळे (अकोला). ५७ किलो गटात प्रथम शिवानी करचे (पुणे), द्वितीय विशाखा चव्हाण (पुणे), तृतीय संस्कृती क्षीरसागर (नाशिक).
हेही वाचा…चंद्रपूर : ताडोबा बफरमध्ये वाघ मृतावस्थेत आढळला
विजयी स्पर्धकांना आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले. पंच म्हणून बनकट यादव, नवनाथ धमाल, अशोक देशमुख, अनंत नवाथे यांनी कामगिरी बजावली. आयोजनासाठी नितीन नेमाने, जीवन उबरहंडे, अजय बिलारी, श्रीकृष्ण शिंदे, विशाल खंडारे, सारंग उबाळे यांनी सहकार्य केले.