बुलढाणा: कारवाईनंतर अवघ्या २४ तासातच आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका कारवाईनंतर हा सुखद चमत्कार घडला. प्रभारी अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जी .आर. गावंडे, किशोर पाटील, आर.आर. उरकुडे, एस.डी. चव्हाण यांनी ३० सप्टेंबरला राज्यमार्गावरील परवाना नसताना मद्यपानाची मुभा देणाऱ्या हॉटेल्स चालक व त्याठिकाणी मद्यपान करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई केली. चिखली, मेहकर परिसरातील काकाजी ढाबा, श्रीयोग, विघ्नहर्ता, अन्नदाता या हॉटेल्समध्ये ही कारवाई करून मद्यपान करणाऱ्या ग्राहकांना रंगेहात पकडण्यात आले. यानंतर २४ तासातच तपास करून चिखली न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>> नागपूर : काँग्रेसमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण खालच्या स्तरापर्यंत व्हावे; काँग्रेस नेते शशी थरूर यांची अपेक्षा

दरम्यान, न्याय दंडाधिकारी एच. डी. देशींगे यांनी ५ मद्यपींना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा तर हॉटेल्स चालकांना प्रत्येकी ४० हजारांचा दंड सुनावला. दोन्ही मिळून दंडाची रक्कम १ लाख ५ हजार इतकी आहे. ही जलदगती कारवाई व न्यायदान कौतुकाचा विषय ठरला आहे.

Story img Loader