जिल्ह्यात ३० एप्रिलला ५ बाजार समित्यांच्या मतदान व रात्री उशिरापर्यंत निकालाची धामधूम सुरु असताना दुसरीकडे निसर्गाचे तांडव देखील सुरू होते. आज १ मे रोजी जिल्हाधिकारी एच पी तुम्मोड यांनी हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३० एप्रिल रोजी दिवसभर बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान, रात्री उशिरापर्यंत मोजणी व निकालाची धूम, जल्लोष सुरू होता. मात्र ३० एप्रिलचा दिवसही ग्रामस्थासाठी काळा दिवस ठरला. या दिवशी सकाळी रताळी ( ता. सिंदखेडराजा) येथील भिकाजी जाधव यांच्या १४ बकऱ्या अंगावर वीज पडून ठार झाल्या तर दोन बकऱ्या गंभीर जखमी झाल्या.

हेही वाचा >>> Video : चंद्रपुरात मुसळधार पाऊस व गारपीट; आझाद बागेसमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी

रविवारी सकाळी सुरू झालेले  अवकाळी थैमान रात्री उशिरापर्यंत सुरू होते. वादळी वा-यासह पाऊस व गारामुळे ( भालगाव, ता. चिखली) येथील ज्ञानबा श्रीपत चव्हाण ( ७५)  यांच्या अंगावर आंब्याचे झाड पडल्याने त्यांचा दबून मृत्यू झाला. देऊळगांव साकारशा (ता. मेहकर )येथे ३० च्या रात्री १२ वाजेदरम्यान जिजाबाई त्र्यंबक आल्हाट यांचे गट नंबर २१५ मधील गोठ्यावर विज कोसळली. यामुळे १ म्हैस मृत झाली आहे. नायगांव देशमुख ( ता. मेहकर) येथील विष्णु रामचंद्र बोराडे यांचे गट नंबर १२२  मधील शेतात झालेल्या गारपिट व पावसामुळे १ म्हैस मृत पावली.   बोराळा (ता. चिखली) येथे वादळ वा-यासह पाऊस झाल्यामुळे तीन शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील टिनपत्रे उडाली असून  भिंत पडल्याने नुकसान झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana rain unseasonal rain hailstorms hit buldhana scm 61 zws