बुलढाणा: नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध मद्य वाहतूक तसेच विक्री मोठ्या प्रमाणात होते. अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कोणत्याही परवानगीविना परवाना मद्यविक्री किंवा अल्पवयीन तरुणांना दारु उपलब्ध होत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाच्या गृह विभागाने नववर्षानिमित्त जिल्ह्यातील मद्यविक्री दुकानांना त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी सुरू ठेवण्याबाबत परवानगी दिली आहे. ३१ डिसेंबरपासून एफएल-दोन, एफएल व बीआर-दोन श्रेणीत मोडणाऱ्या दुकानांना दुसऱ्या दिवशी सकाळी १ वाजेपर्यंत तर एफएल-तीन श्रेणतील दुकानांना दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र विनापरवाना मद्यविक्री होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. संबंधित निरीक्षक, दुय्यम निरीक्षक यांच्यामार्फत जिल्ह्यातील एकूण ७ हजार विदेशी एक दिवसीय मद्यसेवन परवाने वितरित करण्यात आले आहे. विना परवाना मद्यविक्री सुरू असल्याचे आढळल्यास तसेच अल्पवयीन तरुणांना मद्य उपलब्ध होत असल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
prices hike edible oil APMC navi mumbai
खाद्यतेलाच्या दरात ३० टक्के वाढ; निर्यात शुल्क, सोयाबीन दरात वाढ झाल्याचा परिणाम
MNS Raj Thackeray ladki Bahin Yojana
Raj Thackeray on Ladki Bahin Yojana : “फुकट पैसे देऊन महिलांना लाचार बनवताय”, लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंची महायुतीवर टीका!

हेही वाचा – वाल्मिक कराड शरण येणे हे पोलिसांचे अपयश, फडणवीसांच्या मर्यादा स्पष्ट, कॉंग्रेसचा आरोप

जिल्ह्यातील कार्यक्षेत्रीय अधिकारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा, देऊळगाव राजा व खामगाव, राज्य भरारी पथक यांच्याकडून विविध हातभट्टी ठिकाण, अवैध मद्यविक्री केंद्रावर कारवाई करण्यात येत आहे. नववर्षाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्या, हॉटेल्समध्ये होणारी मद्यविक्री यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे.

हेही वाचा – नागपूर की मिर्झापूर… गृहमंत्र्याच्या शहरात वर्षभरात ९० हत्या, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

अडीच कोटींचा माल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध विक्री, मद्यनिर्मिती व वाहतूक प्रकरणी एक मार्च ते आजपर्यंत विशेष मोहीम राबवून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक हजार व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ११४ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी दिली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Story img Loader