बुलढाणा : नववर्षानिमित्त प्रामुख्याने चिखलदरा, ताडोबा, महाबळेश्वर, लोणावळा सारख्या पर्यटन स्थळी जाऊन ‘निसर्गाचा आनंद घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र संत गजानन महाराज यांच्या निस्सीम भक्तांसाठी शेगावातील संत गजानन महाराज हेच दैवत असल्याने तेथे दर्शनासाठी नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो आबालवृद्ध भाविक शेगावात डेरेदाखल होतात. यंदाचे मावळते वर्षसुद्धा भाविकांच्या या अलिखित परंपरेला अपवाद ठरले नही.

मंगळवारी, ३१ डिसेंबर रोजी विदर्भ पंढरी शेगाव भाविकानी गजबजल्याचे चित्र आहे. आज पहाटेपासून बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भ आणि राज्यातून हजारो भाविक मिळेल त्या वाहनानी शेगावात दाखल झाले. रात्री मुक्कामी असणाऱ्या भाविकानी मंगळवारी पहाटेच दर्शन घेतले. सकाळपासून दर्शनबारीमध्ये भविकांच्या रांगा वाढताच गेल्या. दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर नुसता फुलून गेला. विजय ग्रंथ पारायण सभागृह, महाप्रसादालय इथे भक्तांची गर्दी उसळली. प्रत्यक्ष दर्शनासाठी दोन तास तर मुख दर्शनासाठी विसेक मिनिटे लागत असल्याचे चित्र होते.

हेही वाचा – …तर नागपुरातच सापडला असता वाल्मिक कराड!

चोख व्यवस्था

दरम्यान आज हजारोच्या संख्येने भाविका येणार या दृष्टीने संत गजानन महाराज संस्थांनातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परीसराची आकर्षक सजावट करण्यात आली. शेकडोच्या संख्येतील सेवेकरी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले. संस्थान तर्फे करण्यात येणाऱ्या मोफत प्रसाद वितरणचा हजारो भाविकानी लाभ घेतला. आज, उद्या बुधवारी आणि परवा येणाऱ्या गुरुवारी भाविकांची गर्दी कायम राहण्याची चिन्हे आहेत.

मंदिर आज रात्रभर खुले

दरम्यान राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि दर्शन बारिवार होणारा ताण कमी करण्यासाठी आज एकतीस डिसेंबरला गजानन महाराज मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. राज्यभरातून येणाऱ्या भक्तांच्या सोईसाठी संस्थानने हा निर्णय घेतला.

हेही वाचा – पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडचे आत्मसमर्पण, वडेट्टीवारांचा दावा

नविन वर्षाची सुरुवात श्रींच्या दर्शनाने करण्यासाठी शेगाव संतनगरीत नववर्षाच्या एक दिवसपूर्वी आणि पूर्वसंध्येलाच भाविक भक्तांची मोठी गर्दी झाली. यामुळे श्रींच्या दर्शनासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे भक्तांना श्रींचे दर्शन लवकर व्हावे, दर्शनासाठी सुविधा व्हावी, म्हणून श्री संत गजानन महाराज संस्थानकडून आज मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी नवीन वर्षानिमित्त देखील भाविकांची लाखोच्या संख्येने संतनगरीत गर्दी होत असते. राज्यासह देश विदेशातील भाविक देखील नवीन वर्षाची सुरुवात श्रींच्या दर्शनाने करतात. त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्यापासूनच संतनगरीत सतत दोन दिवस भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते.

Story img Loader