बुलढाणा : बुलढाणा तालुका शिवसेनेची महत्त्वाची बैठक आज शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. वरकरणी संघटनात्मक विषयांवर असली तरी या बैठकीत ‘मिशन-४५’ आणि ‘जाहिरात अध्याय’चे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा अजिंठा महामार्गावरील ‘बी. के. लॉन्स’मध्ये आज बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे राहणार आहे. शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बैठकीसाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, उप तालुका प्रमुख, विभाग, शाखा प्रमुख, उप प्रमुख यांना निमंत्रित करण्यात आल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. बैठकीत संघटनात्मक बाबीवर विचारविनिमय व मार्गदर्शन होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – चंद्रपूर : ४५ गरोदर माता ‘एचआयव्ही’ बाधित, दोन वर्षांत आढळले ३४७ नवे रुग्ण

जाहिरात प्रकरण गाजणार

या बैठकीत आक्रमक समजले जाणारे तिन्ही नेते भाजपाच्या ‘मिशन-४५’ आणि बहुचर्चित ‘जाहिरात’ प्रकरणी काय बोलतात, काय वक्तव्य करतात हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. काल परवा भाजपाला खडे बोल सुनावणारे आमदार गायकवाड मित्र पक्षावर काय बोलतात याकडेही लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana taluka shiv sena meeting today possibility of stormy discussion on various topics scm 61 ssb