बुलढाणा : पावसाने दीर्घकाळ उघडीप दिल्याने बुलढाणा शहर परिसरात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. बुलढाण्यातील किमान तापमान ३३ डिग्रीच्या घरात गेले आहे.
मागील काही दिवसांत शहर परिसराच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे दिवसा व रात्रीही पावसाळा की उन्हाळा? असा प्रश्न लाखावर नागरिकांना पडत आहे. दिवसा कडक उन्ह आणि रात्री पंखा वा कुलरचा वापर अत्यावश्यक असे चित्र आहे.
हेही वाचा – तब्बल दोन दशकांनंतर मराठी माणसाची वनबलप्रमुखपदी नियुक्ती
गुरुवारी बुलढाण्याचे कमाल तापमान ३२.२ डिग्री तर किमान २२.३ डिग्री इतके होते. बुधवारी ३१ कमाल, किमान २१.८ डिग्री, मंगळवारी कमाल ३०.६, किमान २१.५ डिग्री तापमानाची नोंद झाली. २८ ऑगस्टला कमाल ३० तर किमान २०.५ डिग्री तापमान होते. शहरात उन्हाळ्याच्या प्रारंभी कमाल तापमान ३० ते ३२ डिग्री तर किमान २२ ते २५ डिग्री दरम्यान राहते. हिवाळ्यात कमाल तापमान २२ ते २५ डिग्री दरम्यान तर किमान १० ते १५ डिग्रीच्या दरम्यान तापमान राहते. शासकीय सूत्रांनी ही माहिती दिली.