खामगाव तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासला. गेल्या वर्षभरापासून शिक्षिकेच्या मागे लागलेल्या शिक्षकाने तिच्या नावे प्रेमकविता लिहून ती समाज माध्यमांवर प्रसारित केली. शिक्षिकेच्या तक्रारीवरून विकृत शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रोहिदास रामदास राठोड, असे या विकृत शिक्षकाचे नाव. तो खामगाव तालुक्यातील एका शाळेत सेवारत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : वर्धा : ट्रकला धडकली कार ; दोघे जागीच ठार ; केळझरमध्ये भीषण अपघात

गेल्या वर्षभरापासून त्याची सहकारी विवाहित शिक्षिकेवर वाईट नजर होती. वाईट हेतूने तो शिक्षिकेशी जवळीक साधायचा. गेल्या ३० नोव्हेंबर २०२१ ते ३० ऑगस्ट २०२२ दरम्यान त्याने शिक्षिकेशी वाईट वर्तणूक केली. यावर कळस म्हणजे, त्याने शिक्षिकेच्या नावे प्रेमकविता लिहून ती समाज माध्यमांवर तिच्या नावे प्रसारित केली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी राठोडविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. शिक्षकाच्या या विकृत प्रतापामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana the teacher wrote a love poem in the name of the teacher and circulated it on social media tmb 01