बुलढाणा : शीर्षक वाचून कुणीही बुचकळ्यात पडणे स्वाभाविक आहे. कारण बहुतेक उमेदवार करोडपती असताना मतदानानंतर लखोपती कसे झाले? असा प्रश्न त्यांना पडणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका नुकतेच पार पडल्या. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला असून जिल्ह्याचे ७ नूतन आमदार ठरले आहे. यंदाच्या निवडणुकीत तब्बल सहा उमेदवारांनी १ लाखावर मते घेतली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे हे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे. यातील पाच ‘लखोपती’ आमदार झाले तर लाखांवर मतदान घेऊनही एक दुर्देवी उमेदवार पराभूत झाला आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे जिल्हा अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी १लाख 6 हजार११ मते घेतली.मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. याचे कारण त्यांच्या प्रतिस्पर्धी आमदार श्वेता महाले या १ लाख ९ हजार २१२ मते घेत जास्त लोकप्रिय ठरल्याने विजयी झाल्या. यंदाच्या लढतीतील भाजपचे चारही उमेदवार विजयी ठरले आणि त्या चौघांनी लाखावर मते घेतली हे विशेष! आमदार श्वेता महाले यांच्या सह भाजपच्या चारही उमेदवारांनी लाख पेक्षा जास्त मतदान घेत विजय मिळविले आहे. मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेती यांनी १लाख ९हजार ९२१ मते घेत विजयश्री खेचून आणली. मागील २०१९ च्या पराभवाचा त्यांनी वचपा काढला आहे. मागील लढतीतील प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांचा त्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २६ हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
हेही वाचा : आणखी एका पराभूत उमेदवाराची ईव्हीएमवर शंका… अडीच लाख रुपये भरून….
ते विक्रमी सहाव्यांदा आमदार झाले आहे. खामगाव मध्ये भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १लाख १० हजार मतदान घेत तिसऱ्यांदा बाजी मारली. जळगाव जामोद मतदारसंघा मध्ये भाजप उमेदवार संजय कुटे यांनी सलग पाचव्यांदा आमदारकी मिळविली.त्यांनी १ लाख ७ हजार ३१८ मते घेत विजय मिळविला. शिंदे गटाचे संजय गायकवाड हे दुसऱ्यांदा बुलढाण्याचे आमदार झाले. मात्र त्यांना ९१ हजार ६६० पर्यंतच मजल मारता आली. याचे कारण ठाकरे गटाचा जयश्री शेळके यांनी त्यांना कडवी झुंज देत ९० हजार८१० मताचा टप्पा गाठत ८४१ मतांनी पराभव स्वीकारला.
सिंदखेडराजा आमदार मनोज कायंदे यांना तिरंगी लढतीमुळे ७३९१३ पर्यंत मजल मारता आली. मात्र माजी मंत्री राजेंद्र शिंगणे आणि शिंदे गटाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांचा पराभव करून खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरले आहे. ३० वर्षानंतर सिंदखेडराजा ला नवीन नेतृत्व लाभले आहे. मात्र या आमदारांना लाखावर मतदान मिळाल्याने ते लखोपती ठरले एवढेच!
हेही वाचा : तेलंगणाच्या महाकाय प्रकल्पामुळे धोका वाढला! गडचिरोलीला चार वर्षांत चार भूकंपाचे धक्के…
ठाकरे गटाचे खरात यांनाही लाखावर मते
शिवसेना ठाकरे गटाचे मेहकर मधील उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी पहिल्याच लढतीत आमदार संजय रायमूलकर याना पराभूत केले. २००९ पासून सलग तीनदा आमदार झालेले संजय रायमूलकर यांना पराभूत करून ते ‘जायंट किलर’ ठरले. आमदार खरात यांनी १०४२४२ मते घेत शिंदे गटाला मोठा दणका दिला. तरीही रायमूलकर यांनी लाखापर्यंत धडक देत ९९४२३ मते घेतली.