बुलढाणा : कोणत्याही मोठया निवडणुकीत अमानत रक्कम अर्थात डिपॉझिट हा लाखो मतदारांसाठी उत्सुकतेचा विषय राहतो. निवडणुकीत मोठ्या विश्वासाने, जिंकण्याच्या निर्धाराने उतरणाऱ्या उमेदवारासाठी भरलेल्या अमानत रक्कमेचे अप्रूप राहते. निवडणूक प्रचाराचे स्वरूप आमूलाग्र बदलले असले, प्रचार ‘हायटेक’ झाला असला तरी निकालापूर्वी कुणाचा डिपॉझिट वाचणार यावर चर्चा होतेच, निकाल लागल्या लागल्याच कुणाकुणाचे ‘डिपॉझिट गुल’ झाले हा प्रश्न उपस्थित होतो.

बुलढाणा जिल्ह्यात यंदाही हे मजेदार चित्र कायम राहिले . सातही विधानसभा मतदारसंघात खोऱ्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. प्रस्थापित राजकीय पक्षांचे उमेदवार तर मैदानात होतेच. याशिवाय महाराष्ट्र स्वराज्य पार्टी, जय सेवालाल बहुजन विकास पार्टी, रिपब्लिकन सेना, आझाद समाज पार्टी(कांशीराम), जन तांत्रिक समता पार्टी, मायनारीटी डेमोक्रॅटिक पार्टी, इंडियन नॅशनल लीग, जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, स्वाभिमानी पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष, जनहित लोकशाही पार्टी, मजलिस ए- इंकलाब-ए- मिलत या पक्षांचे हौशी उमेदवार रिंगणात उतरले. या शिवाय प्रत्येक निवडणुकीत दिसून येणाऱ्या अपक्ष उमेवारांचा भरणा होता.

अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
Transfer of Rs 1500 aid under Ladki Bahin scheme resumes in Maharashtra
Ladki Bahin scheme : ६७ लाख ‘लाडक्या बहिणीं’ च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा
Bangladeshi infiltrators Dhule, Four Bangladeshi infiltrators arrested, Bangladeshi infiltrators,
धुळ्यातून चार घुसखोर बांगलादेशी ताब्यात
Anil Aggarwal Success Story
Success Story : तब्बल नऊ वेळा अपयश येऊनही न खचता प्रयत्नांची शिकस्त; आज करोडोच्या कंपनीचे मालक
Chandrapur district bank loksatta news
चंद्रपूर जिल्हा बँक नोकर भरती : एका जागेसाठी ४० लाख दर; आमदाराचा विधानसभेत आरोप

हेही वाचा : महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘या’ मार्गावर धावणार अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या

१५ उमेदवारांवरील नामुष्की टळली

मोठ्या संख्येने आलेल्या पैकी काही अर्ज छाननीत बाद झाले. तरीही आमदारकीच्या ७ जागासाठी १८७ उरले. यातील ७२ जणांनी वेगवेगळ्या कारणांनी , काहींनी अर्थकारण तर काहींनी समाजकारण मुळे माघार घेतली. तरीही रिंगणात ११५ उमेदवार शिल्लक राहिले. चिखली (२४ उमेदवार) सारख्या काही मतदारसंघात दोन ब्यालेट युनिट लावावे लागले. निकाला अंती यातील तब्बल १०० उमेदवारांचे ‘डिपॉझिट गुल’ झाल्याचे स्पष्ट झाले. केवळ विजेते आणि उपविजेते मिळून १५ जणांचीच अमानत रक्कम आणि नामुष्की वाचली. सिंदखेडराजा मध्ये तिरंगी लढत असल्याने आमदार मनोज कायंदे आणि राजेंद्र शिंगणे व शशिकांत।खेडेकर या तिघांची रक्कम वाचली. उर्वरित मतदारसंघात विजेता आणि दुसऱ्या क्रमांकवरील उमेदवार यांचेच डिपॉझिट वाचले.

हेही वाचा : वर्षभरानंतर होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा; याबद्दल जाणून घ्या महत्वाच्या बाबी

असा होता हिशेब

सर्व साधारणसाठी १० हजार तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी ५ हजार अशी अमानत रक्कम होती. झालेल्या वैध मतदाना पैकी १/६ पेक्षा जास्त मतदान मिळालेल्या उमेदवारांची अमानत वाचली. सात मतदारसंघात ३२ ते ३८ हजार असे मतदान निहाय आकडा निर्धारित करण्यात आला होता. मात्र वंचित बहुजन आघाडीसह वरील नवीन पक्ष आणि अपक्ष यापैकी कुणाचेच डिपॉझिट वाचले नाही.

Story img Loader